शहर काँग्रेस कमेटीचे नेतृत्त्व : जटपुरा गेटवर आंदोलनचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा (शहर) काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या काही मंत्र्यांचा निषेध करण्यासाठी जटपुरा गेटजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने देण्यात आली.भाजपाच्या मंत्री वसुंधरा राजे (मुख्यमंत्री राजस्थान), सुषमा स्वराज (परराष्ट्र केंद्रीय मंत्री) यांनी ललीत मोदी यांच्या भ्रष्टाचारात मदत केली व त्या भ्रष्टाचारात मोठी भूमिका घेतली. तसेच स्मृती इराणी (शिक्षण केंद्रीय मंत्री) यांनी खोटी पदवी घेतली व पंकजा मुंडे- पालवे (बालकल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य) यांचा २०६ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार तसेच विनोद तावडे (शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य) यांनी बोगस विद्यापीठाची पदवी घेतली व ती पदवी शिक्षणात वैद्य नाही, असा आरोप यावेळी करण्यात आला. त्यांच्या निषेधार्थ चंद्रपूर जिल्हा (शहर) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू संभाजी नागरकर यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले.सर्वप्रथम महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. भारतीय जनता पार्टीच्या मंत्री वसुंधरा राजे, सुषमा स्वराज, स्मृती इराणी, पंकजा मुंडे- पालवे यांच्या प्रतिमेचे पुतळे बनवून, पदवीधर पोशाख घातलेला विनोद तावडे, क्रिकेटची कीट घातलेला ललित मोदी यांना प्रदर्शित करुन भ्रष्ट्राचाराचा विरुद्ध निदर्शन करण्यात आले. यावेळी काळे झेंडे दाखवून,‘ कधी नव्हे ती सत्ता आली बघा खण्यात, एकाच दिवशी गेले २०६ कोटी पाण्यात, ‘कष्टाने शिकलेला विद्यार्थी खातोय बेरोजगाराची हवा, बोगस पदविवाल्याला मिळतेय लाल दिवा’, ‘कमल का फुल जनता की भुल’ अशा प्रकारे घोषणा करण्यात आल्या. यावेळी जटपुरागेट नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. यावेळी निषेध व्यक्त करताना पोलिसांनी आंदोलनकर्त्यांचे साहित्य जप्त केले.यावेळी माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंह गौर, महाराष्ट्र प्रदेश सचिव सुनिता लोढिया, उपाध्यक्ष अॅड. विजय मोगरे, महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, आसावरी देवतळे, माजी महिला जिल्हाध्यक्ष नंदा अल्लुरवार, महेश मेंढे, माजी नगरसेवक वंदना भागवत, डॉ. विजय देवतळे, केशव रामटेके, अॅड. मलक शाकीर, बंडोपंत तातावार, सुरेश दुर्सेलवार, शाम राजूरकर, दीपक कटकोजवार, निखील धनवलकर, पंकज नागरकर, रुचित दवे, पंकज टापरे, हेमंत नागरकर, सचिन सहारे, शफीरुद्दीन ख्वाजा, रौनक लोढीया, अब्दुल काझी, गिरीश पात्रीकर, अजय दास, सागर खोब्रागडे, विक्रम खनके, वैभव बानकर, वसीम रंंगरेज, वकार काझी, हरिदास नागापुरे, शोभा सपकाळे, सोनी मडावी, मेघा मडावी, कांता मडावी, दर्शना गेडाम, अंजू गेडाम, वंदना मडावी, लक्ष्मी मेश्राम आणि कार्यकर्ते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
‘त्या’ मंत्र्यांविरोधात निदर्शने
By admin | Updated: July 2, 2015 01:26 IST