चंद्रपूर : नाभिक समाज हा आर्थिकदृष्ट्या मागसलेला समाज आहे. या समाजाची प्रगती झाली नाही. या समाजाला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी महाराष्ट्र नाभिक महामंडळाद्वारे आयोजित नाभिक समाजाच्या उपवर वधू परिचय मेळाव्यामध्ये दिली. शनिवारी स्थानिक समाधी वॉर्डातील श्री संत नगाजी महाराज वस्तीगृहात हा मेळावा पार पडला. मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून आ. नाना शामकुळे, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश कार्याध्यक्ष दिनकर गोरे, प्रदेश अध्यक्ष पुंडलिक केळझरकर, विभागीय अध्यक्ष डॉ. मैदनकर, नायब तहसीलदार लता किन्हीकर, नायब तहसिलदार चंद्रपूर, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष श्याम राजुरकर, प्रसिद्धी प्रमुख दिनेश एकवनकर, आदर्श शिक्षिका सरोज चांदेकर, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी गोपालकृष्ण मांडवकर, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे डुडू नक्षिणे, आदर्श शिक्षक हरीश ससनकर, राज एकवनकर, संध्या कडूकर, विजय कोंडस्कर, गुणवंत वाटेकर उपस्थित होते.दिनकर गोरे यांनी आपल्या भाषणात समाजाच्या विविध समस्यांवर प्रकाश टाकला. त्याचे निवेदन ना. हंसराज अहीर व आमदार नाना शामकुळे यांना सोपविण्यात आले. मेळाव्यामध्ये ७४ उपवर-वधंूनी नोंदणी केली व परिचय दिला. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष दीपक नक्षणे यांनी केले. संचालन वंदना चिंचोलकर यांनी केले. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत जिल्हाध्यक्ष दीपक नक्षणे, जिल्हा सचिव मनोज पिजदुरकर, कोषाध्यक्ष मनोहर चौधरी, उपाध्यक्ष दत्तात्रय पंदीलवार, सचिव रमेश हनुमंते यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महामंडळाचे कार्यकर्ते किरण सुर्वे, गुलाब वाटेकर, रवि वानकर, संदेश चल्लीरवार, कमलेश बडवाईक, शंकर चावके, प्रकाश सुर्वे, बंडू गौरकर, भानुमती बडवाईक, सुनिता पारपल्लीवार, रोशन चावके यांनी परिश्रम घेतले. आभार भानोसे यांनी मानले. (प्रतिनिधी)
नाभिक समाजाच्या मागण्या योग्य - हंसराज अहीर
By admin | Updated: February 20, 2015 00:52 IST