उद्योग सुरू करण्याची मागणी
घुग्घुस : या भागातील अनेक उद्योग बंदअवस्थेत पोहोचले आहेत. त्यामुळे परिसरातील गावांमध्ये सुशिक्षित बेरोजगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. घुग्घुसमधील एमआयडीसीमध्ये उद्योगांना घरघर लागली आहे. वेकोलितही तांत्रिक कामगारांची नियुक्ती बंद आहे. त्यामुळे आयटीआयचे प्रशिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांमध्ये वाढ झाली आहे. सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न तीव्र होत चालला आहे.
वटवाघळांचे अस्तित्व आले धोक्यात
नागभीड : अलीकडे वटवाघळांची संख्या कमी होत चालली आहे. त्यांचे अस्तित्व नाहीसे झाल्यास निसर्गाचे चक्र बंद पडेल तसे होऊ नये म्हणून मानवी संघटना व शासन व्यवस्थेने प्रयत्न करणे गरजेचे आहे. परंतु याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने पक्षी मित्र संघटनांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
कोरपना तालुक्यातील महामार्ग मृत्युमार्ग
कोरपना : तालुक्यातून एक राष्ट्रीय महामार्ग, चार राज्य महामार्ग जातात. याचबरोबर प्रमुख जिल्हा महामार्ग, तालुका महामार्ग व ग्रामीण रस्तेही मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, यातील बहुतांश रस्त्यावर खड्डे पडले आहे. या मार्गावरून प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
पोलिसांची ग्रस्त वाढविण्याची मागणी
चंद्रपूर: शहरात मागील काही महिन्यांमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. दिवसेंदिवस या घटनांत वाढ होत आहे. परिणामी नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.