शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सिग्नल सुरु करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:29 IST

प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त चंद्रपूर : जिल्ह्यात औष्णिक वीज प्रकल्प आहेत. त्या प्रकल्पातून निघणाऱ्या धुरांमुळे जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या ...

प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त

चंद्रपूर : जिल्ह्यात औष्णिक वीज प्रकल्प आहेत. त्या प्रकल्पातून निघणाऱ्या धुरांमुळे जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे या प्रदुषणाच्या समस्येवर आळा घालण्याची मागणी केली जात आहे.

एटीएमध्ये सुरक्षा रक्षक नाही

चंद्रपूर : शहरात काही ठिकाणी एटीएममशीन बसविण्यात आल्या. मात्र मागील काही दिवसांपासून पैशाचा ठणठणाट आहे. त्यातच सुरक्षा रकक्षही नसल्यामुळे एखादी घटना घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

वीज खांबामुळे अपघाताचा धोका

चंद्रपूर : शहरातील काही चौकामध्ये रस्त्याच्या मधोमध वीज खांब आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे खांब काढून दिलासा द्यावा,अशी मागणी केली जात आहे.

गर्दीवर नियंत्रण नाही

चंद्रपूर : ग्रामीण भागातील काही गावांतील नागरिकांकडे अद्यापही आधार कार्ड नसल्याने नागरिक आधार कार्ड काढण्यासाठी शहरात येत आहेत. ग्रामीण भागात शेतमजुरांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आधार कार्डची गरज असते. त्यामुळे आधार कार्ड नोंदणी केंद्र शोधताना सध्या नागरिक दिसत आहे. त्यामुळे गावागावात आधार कॉर्ड केंद्र सुरु करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

अतिक्रमण हटाव मोहीम राबवावी

चंद्रपूर : शहरातील विविध मार्गांवर दुकानदार व काही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. यामुळे अनेकवेळा वाहतुकीचा खोळंबा होत आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था योग्य ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाने मोहीम सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

नेटवर्कअभावी ग्राहक त्रस्त

चंद्रपूर : शहरातील काही वार्डामध्ये विविध कंपन्यांसह बीएसएनएलचेसुद्धा नेटवर्क नाही. त्यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहे. त्यातच ऑनलाईन अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नेटवर्क समस्या सोडविण्याची मागणी केली जात आहे.

बेरोजगारांमध्ये नैराश्य वाढले

चंद्रपूर: जिल्ह्यात मोठ्या संख्येने सुशिक्षीत बेरोजगार असून त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे ते नैराश्यात सापडले आहे.त्यामुळे या तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी तसेच जिल्ह्यात अधिकधिक उद्योगाची निर्मिती करावी, अशी मागणी बेरोजगारांकडून केली जात आहे.

फळांची मागणी वाढली

चंद्रपूर : रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी विटामिन सीयुक्त फळे खायला नागरिक पसंती देत आहेत. त्यातच आता ‌उन्हाळ्याचे दिवस सुरु झाल्यामुळे सध्या बाजारपेठेत फळे खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी बघायला मिळत आहे.

मनपाच्या दुर्लक्षाने अतिक्रमण वाढले

चंद्रपूर : शहरातील गांधी मार्ग तसेच कस्तुरबा मार्गावर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने अतिक्रमण हटवून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.