शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
4
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
5
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
6
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
7
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
8
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
9
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
10
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
12
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
13
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
16
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
17
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
18
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
19
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
20
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?

गतिरोधक तयार करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:29 IST

टेमुर्डा : येथील रस्त्यांवर अपघाताची शक्यता वाढली आहे. या ठिकाणी तातडीने गतिरोधक तयार करावे, अशी मागणी केली ...

टेमुर्डा : येथील रस्त्यांवर अपघाताची शक्यता वाढली आहे. या ठिकाणी तातडीने गतिरोधक तयार करावे, अशी मागणी केली जात आहे. परिसरातील मोठी बाजारपेठ येथे असल्याने नेहमी रस्त्यांवरून नागरिकांची वर्दळ असते. सध्या वाहनांची संख्याही वाढली आहे.

लेंडीजाळा गाव डांबरी रस्त्यापासून वंचित

जिवती : तालुक्यातील आंध्र- महाराष्ट्र सीमेवर असलेले लेंडीजाळा गाव दोन्ही राज्याच्या कात्रित मूलभूत सोयी-सुविधांपासून गेल्या अनेक वर्षांपासून वंचित असून येथील ग्रामस्थांनी पाणी व पक्क्या रस्त्यासह मुूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तालुक्यातील वादग्रस्त असलेल्या या लेंडीजाळा गावात रस्त्याची दयनीय अवस्था आहे.

आसिफाबाद मार्गावर वाहतुकीची कोंडी

राजुरा : राजुरा ते आसिफाबाद मार्गावरील रेल्वेगेटवर नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे, अशी मागणी केली जात आहे.

कोरपना येथे रेल्वे मार्ग तयार करावा

कन्हाळगाव : कोरपना ते कायरपर्यंत नवीन रेल्वेमार्गे तयार करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. औद्योगिक तालुका म्हणून कोरपना तालुक्यातील ओळख आहे. मात्र पाहिजे तसे रेल्वेचे जाळे अद्यापही तयार झाले नसल्याने अनेक समस्या आहे.

सिंचनाच्या सोई उपलब्ध करून देण्याची मागणी

जिवती : जिवती तालुक्यात सिंचनाच्या सोयी उपलब्ध न झाल्याने तालुका अजूनही मागासलेला आहे. हा तालुका पूर्णत: शेतीवर अवलंबून असल्याने सिंचनाशिवाय विकास अशक्य आहे. तालुक्यात कोणत्याही प्रकारचे उद्योगधंदे नसल्याने बहुतांश जनता शेतीवरच आपला संसार चालवित आहे.

रिक्तपदांमुळे आरोग्य सेवा विस्कळीत

वरोरा : ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळावा याकरीता प्रशासनाच्या वतीने आरोग्य यंत्रणा ग्रामीण भागात उभी केली आहे. मात्र रिक्त पदांमुळे आरोग्य यंत्रणेला खिळ बसली बसली आहे. यामध्ये वरोरा तालुक्यात चार प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचाºयाचे अनेक पदे मागील अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत.

वळण मार्गावर अपघाताची शक्यता

कोरपना: तालुक्यातील हेटी या गावातून वणी-कोरपना मार्ग जातो. मात्र या मार्गावर मोठे वळण असल्याने अनेकदा या ठिकाणी अपघात होत आहेत. हे अपघात टाळण्यासाठी या गावातून जाणाºया रस्त्यावर रस्ता दुभाजक तयार करण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे, याच रस्त्यावर शाळा आहे. सध्या लॉकडाऊनमुळे शाळा बंद आहे. मात्र शाळा सुरु झाल्यानंतर हा मार्ग धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.

पाण्याच्या टाक्या ठरल्या शोभेच्या वास्तू

नागभीड : जिल्ह्यातील अनेक गावांत नळयोजनेअंतर्गत लाखो रुपये खर्च करून पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या. परंतु या टाक्या शोभेच्या वास्तू ठरत आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे अनेक गावांत नळयोजनेचे पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.

अल्पवयीनांच्या हाती वाहनांच्या चाव्या

घुग्घूस: दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढल्याने तालुक्यात अपघाताच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. अल्पवयीन मुले मोटरसायकलवर स्वार होवून सुसाट वेगाने गाड्या चालवितात. त्यांच्याजवळ गाडी चालविण्याचा परवानाही नसतो. पोलीस प्रशासनाने अल्पवयीन वाहनचालकांवर नजर ठेवून त्यांना आवर घालावा, अशी मागणी होत आहे.

समाज मंदिर दुर्लक्षित

कोरपना : तालुक्यातील बहुतांश समाजमंदिराकडे संबंधित अधिकारी लक्ष देत नसल्याने ते दुर्र्लक्षित आहे. काही समाजमंदिराच्या खिडक्या चोरीला गेल्या आहे. ज्या उद्देशासाठी शासनाने समाजमंदिरांची उभारणी केली त्या उद्देशाला बगल दिली जात आहे.