शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रपट्याचे रुपांतर पुलात करण्याची मागणी

By admin | Updated: April 10, 2015 00:59 IST

मूल तालुक्यातील भेजगाव राजकीयदृष्टया संवेदनशिल म्हणून परिचत आहे.

भेजगाव : मूल तालुक्यातील भेजगाव राजकीयदृष्टया संवेदनशिल म्हणून परिचत आहे. आजपर्यंतच्या मूल पंचायत समितीच्या इतिहासात भेजगाव येथील रहिवासी असलेल्या पाच व्यक्तींची मूल पंचायत समितीच्या सभापतीपदी वर्णी लागली. ही बाब भेजगावच्या गौरवाची असली तरी विकास मात्र शून्य आहे.या परिसरात भेजगाव केंद्रस्थानी असून परिसरात १५ गावे आहेत. हळदी-भेजगाव या गावांच्या शिवेवरुन उमा नदी वाहते. या नदीवर जवळपास ३० वर्षांपूर्वी रपटा बांधण्यात आला. मात्र काळानुरुप या रस्त्यावरुन रहदारी वाढली. मात्र या नदीवरील रपट्याचे पुलात रुपांतर झाले नाही. हा रस्ता कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत बंद राहतो. पावसाळ्याच्या दिवसात १५-१५ दिवस हा मार्ग पाण्याखाली राहतो. कधी मोठमाठे भगदाड तर कधी मधोमधे पुल दबल्याचा प्रकारही घडला आहे.भेजगाव परिसरातील भेजगाव, दुगाळा माल, चकदुधाळा, भेजाळी, बाबराळा, सिंतळा, रेगडी, येरगाव, पिपरीदीक्षित, चकबेंबाळ, चकघोसरी, थेरगाव आदी गावातील नागरिकांचे या पुलामुळे जनजीवन विस्कळीत होते. विद्यार्थ्यांचे शिक्षण, परिसरात ओलिताची शेती करीत असल्याने व दुग्ध व्यवसाय जोमात असल्याने शेतकऱ्यांना बाजारपेठेपासून मुकावे लागत आहे. राष्ट्रीयकृत बँका नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावरील चिंचाळा येथे असल्याने बॅकींग सेवेपासूनही मुकावे लागत आहे.हा रस्ता जिल्हा परिषदेअंतर्गत आहे. पुलाच्या बांधकामाची अंदाजित रक्कम चारवर्षांपूर्वी कमी होती. ती आता वाढून जवळपास १० करोडच्या जवळपास आहे. त्यामुळे जिल्हा परिषद एवढा मोठा निधी या पुलावर खर्च करण्यासाठी पुढे येत नाही. विशेष म्हणजे मूल तालुका पूर्वी सावली व आताच्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात येते. आतापर्यंत हे क्षेत्र भाजपाच्याच ताब्यात राहिले. मात्र दुर्दैवाने विकासाचा निधी न मिळाल्याने या परिसराचा विकास झाला नाही. (वार्ताहर)