चिमूर : चिमूर नगर परिषद नव्यानेच निर्माण झाली. चिमूरच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यमान आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी साडेआठ कोटी रुपये मंजूर केले. परंतु, या नगर परिषदेत नियोजनबद्ध काम होत नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. येथे कायमस्वरूपी मुख्याधिकारी नाही. नगर परिषदमध्ये नवीन नगरसेवक निवडून आल्यामुळे अडचणी आल्यास मुख्याधिकाऱ्यांना सांगत असतात. मात्र कायम स्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने विकासाला खीळ बसत आहे. या नगर परिषदेवर कायमस्वरूपी मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करावा अन्यथा आंदोलन करणार असल्याचा इशारा नगरसेवक तथा काँग्रेसचे गटनेते अब्दुल कदीर शेख यांनी दिला आहे.चिमूर नगर परिषद अस्तित्वात आली. विविध विभागावर सभापती रूजू झाले. परंतु विकास मान्य शुन्य आहे. येथे मुख्याधिकारी स्थायी नसल्यामुळे येथील आठवडी बाजार व गुजरीचा लिलाव ठरलेल्या दिवसात झाला नाही. नगर परिषदेच्या विकास कामासाठी साडेआठ कोटी रुपये मंजूर झाले असून त्याची नियोजनबद्ध आखणी व्हावी व विकास करावा, असे अब्दुल कदीर शेख, विनोद ढाकुणकर, अॅड. दुधनकर, गोपाल झाडे, कल्पना इंदुरकर, श्रद्धा प्रदीप बंडे, उमेश हिंगे, सिमा बुटके आदी नगरसेवकांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)
स्थायी मुख्याधिकाऱ्याची मागणी
By admin | Updated: March 17, 2016 01:20 IST