शहरं
Join us  
Trending Stories
1
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
2
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
3
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
4
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
5
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
6
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
7
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
8
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
9
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
10
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
11
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
12
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
13
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
14
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
15
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
16
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
17
नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
18
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 
19
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
20
बाजारात तेजीचा 'डबल धमाका'! सेन्सेक्स-निफ्टी सुसाट, 'या' ५ मोठ्या कारणांमुळे वाढ; कुठे झाली घसरण?

आरोग्य उपकेंद्रात लसीकरण सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:28 IST

चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या आहे. काही रुग्ण या महामारीच्या आजारातून बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, नागरिकांना ...

चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या आहे. काही रुग्ण या महामारीच्या आजारातून बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, नागरिकांना पुन्हा कोरोनाची लागण होऊ नये म्हणून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात ४५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना कोरोना लस दिली जात आहे. राजुरासारख्या मोठ्या शहराच्या ठिकाणी १८ पेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना लस दिली जात असली तरी ग्रामीण भागात आरोग्य उपकेंद्र असेल त्या ठिकाणी आरोग्य विभागाने कोरोना प्रतिबंधित लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद चंद्रपूर येथील कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे यांनी आरोग्य विभागाकडे केली आहे. गावपातळीवर लसीकरण केंद्र सुरू झाले, तर होणारी गर्दी टाळता येईल. यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाने सहकार्य करावे, असेही कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे यांनी सांगितले.

बॉक्स

लसीकरणासाठी नागरिकांनी गर्दी टाळावी

कोरोना संसर्गाचा प्रसार झपाट्याने वाढत असला तरी कोरोनावर मात करण्यासाठी शासनाने कोरोना प्रतिबंधित लसीकरण काही ठिकाणी सुरू केले आहे; परंतु ज्या ठिकाणी लसीकरण केंद्र आहे, त्या ठिकाणी नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असल्याने नागरिकांना पुन्हा कोरोना संसर्ग होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी न करता कोरोना प्रतिबंधित लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.