शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

धान पिकांचा विमा देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:34 IST

सिंदेवाही : प्रधानमंत्री पीक विमा योजनेनुसार धान पीक खरीप हंगामासाठी सोसायटीमार्फत बँकेकडून कर्ज घेऊन कर्जाच्या रकमेतून पीक विम्याचे पैसे ...

सिंदेवाही : प्रधानमंत्री पीक विमा योजनेनुसार धान पीक खरीप हंगामासाठी सोसायटीमार्फत बँकेकडून कर्ज घेऊन कर्जाच्या रकमेतून पीक विम्याचे पैसे कपात करून हप्ता भरला. नैसर्गिक आपत्ती झालेल्या पिकाच्या नुकसानीसाठी विम्याचे कवच आहे. झालेल्या नुकसानीचा ४८ तासांत पंचनामा करून ३० दिवसांच्या आत नुकसानीचा विमा शेतकऱ्यांना द्यायचा, असे विमा योजनेत आहे. मात्र, नुकसान होऊनही शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला नाही.

हेक्‍टरी ८५० रुपये शेतकऱ्यांनी विम्याचे पैसे भरले असून हेक्टरी ४२ हजार ५०० रुपये विमा कंपनीने नुकसानीच्या प्रमाणात शेतकऱ्यांना द्यायला हवे. तीन महिने होऊन गेले असून विमा कंपनीने नुकसानीचे पैसे दिले नाही. त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री यांना शेतकरी शेतमजूर महासंघाच्या वतीने विम्याच्या हप्त्याचे पैसे त्वरित मिळावे, यासाठी तहसीलदार गणेश जगदाळे यांच्यामार्फत निवेदन दिले. यावेळी महासंघाचे अध्यक्ष रघुनाथ शेंडे, कार्याध्यक्ष अरविंद जयस्वाल, चंद्रशेखर चन्ने, अशोक सागुदले, सुनील उटलवार, जगन्नाथ पाटील सोनवणे, जानिक वाघमारे, दिनकर बोरकर, यादव पाटील, अशोक तुमे, माधव आदे, विलास रामटेके, मयूर सूचक, लोकमित्र गेडाम, राजू ताडाम उपस्थित होते.