शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पकडीगुड्डम धरणाचे पाणी शेतकऱ्यांना देण्याची मागणी

By admin | Updated: November 29, 2014 23:19 IST

कोरपना तालुक्यातील पकडीगुड्डम मरकागोदी धरणाचे पाणी १२ गावांतील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी तात्काळ देण्याची मागणी सोनुर्ली (वनसडी) येथील सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम आस्वले

गडचांदूर : कोरपना तालुक्यातील पकडीगुड्डम मरकागोदी धरणाचे पाणी १२ गावांतील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी तात्काळ देण्याची मागणी सोनुर्ली (वनसडी) येथील सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम आस्वले तथा शेतकऱ्यांनी एका लेखी निवेदनातून जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.पकडीगुड्डम-मरकागोंदी धरणाखाली लाभक्षेत्रात १२ गावे असून सिंचनाखाली २६८० हेक्टर क्षेत्र आहे. परंतु सदर धरणातील एकूण पाण्यापैकी ३/४ पाणी अंबुजा सिमेंट कंपनीला देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतपिकांसाठी सिंचनासाठी पाणी मिळत नाही. मिळाले तरी अपुरे मिळते. त्यामुळे उत्पन्न मिळत नाही.या धरणाचे पाणी शेतपिकांना मिळण्यासाठी तीन ते चार वेळा चक्का जाम आंदोलन केले. शेतकऱ्यांवर अजुनही कोर्टात कारवाई सुरू आहे. अंबुजा सिमेंट कंपनीला पकडीगुड्डम धरणाचे पाणी देण्याबाबतचा १२ वर्षांचा करार शासनाने केला होता. मात्र तत्कालिन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत आठ वर्षाचा करार केला होता व कंपनीने पैनगंगा नदीवरुन पाणी घेण्याचे निर्देश दिले होते. करार संपून सुद्धा धरणाचे पाणी कंपनीला देणे सुरू असल्याने शेतकऱ्यांना पाणी मिळणे अशक्य झाले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.शासनाने याबाबत दखल घेऊन पकडीगुड्डम धरणाचे पाणी सिमेंट कंपनीला पुरविणे तात्काळ थांबवावे. शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी तात्काळ पाणी द्यावे अशी मागणी पुरुषोत्तम आस्वले तथा १२ गावातील शेतकऱ्यांनी केली आहे.लोकप्रतिनिधींनी सुद्धा शेतकऱ्यांच्या हितासाठी या गंभीर समस्येकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे. निवेदनाच्या प्रति ना. सुधीर मुनगंटीवार, ना. हंसराज अहीर, आ. संजय धोटे, उपविभागीय अधिकारी राजुरा, तहसिलदार कोरपना, ठाणेदार कोरपना यांच्याकडे पाठविल्या आहेत. (वार्ताहर)