शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पैशाची मागणी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 15:07 IST

मृताच्या नातेवाइकांमध्ये संताप : वरिष्ठांनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्क पोंभूर्णा : येथील ग्रामीण रुग्णालय आता शवविच्छेदनासाठी आलेल्या मृतदेहावर कर आकारून टाळूवरील लोणी खाणारी यंत्रणा तयार झाली आहे. याचे जिवंत उदाहरण पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात ५ ऑक्टोबरला पाहायला मिळाले.

चेक ठाणेवासना येथील खासगी इलेक्ट्रिशिअन हा उमरी पोतदार येथील पोस्टमास्तरच्या घराची लाइट फिटींगचे काम करताना झरी मारणारी ग्रैंडर मशीन घेऊन खाली पडला व यात त्याचा मृत्यू झाला. त्याला शवविच्छेदनासाठी पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, शवविच्छेदन करणाऱ्या सहायकांनी मृतकाच्या कुटुंबीयांना चक्क दीड हजार रुपयांची मागणी केली. यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठीही कर आकारला जात असल्याची ओरड असून, शवविच्छेदनासाठी पैसे घेणाऱ्यांना निलंबित करण्याची मागणीही आता नागरिकांकडून केली जात आहे. 

पोंभूर्णा तालुक्यातील चेकठाणेवासना येथील ईश्वर जगन्नाथ चिताडे (४०) हा खासगी इलेक्ट्रिशिअनचे काम करतो. ५ ऑक्टोबर २०२४ ला ईश्वर चिताडे हा उमरी पोद्दार येथील पोस्टमास्तर सीताराम पुरमशेट्टीवार यांच्या घरी इलेक्ट्रिक फिटींगचे काम करताना ग्रँडर मशीन घेऊन तो अचानक खाली पडला व यात त्याचा मृत्यू झाला. त्याला सकाळी ११:३० च्या सुमारास शवविच्छेदन करण्याकरिता पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, शवविच्छेदन करणाऱ्यांनी यासाठी दीड हजार रुपयांची मागणी केली. परंतु, त्या कुटुंबीयांकडे त्यांना देण्याकरिता तेवढे पैसे नव्हते. जमावाजमव करून दीड हजार रुपये त्या कर्मचाऱ्याला दिल्यानंतरच दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास शवविच्छेदन केले. त्यानंतर मृतदेह घेऊन कुटुंबीयांना गावाकडे जाता आले.

"शवविच्छेदन करणाऱ्यांनी दीड हजार रुपयांची कुटुंबीयांकडून मागणी केली. त्यावेळी मी त्या कुटुंबीयांसोबतच उपस्थित होतो. मोफत सेवा देणारी आरोग्य यंत्रणा ही आता शवविच्छेदनावरही कर लादत आहे. त्यामुळे शवविच्छेदनासाठी पैसे मागणाऱ्यांवर कार्यवाही करावी व यानंतर शवविच्छेदनासाठी पैसे घेऊ नये, यासाठी वरिष्ठांनी निर्बंध घालावे."- वैभव पिंपळशेंडे, सामाजिक कार्यकर्ते, चेक ठाणेवासना.

"पैशांसाठी शवविच्छेदन करताना अडवणूक केली व पैशांची मागणी केली, असा जो आरोप करण्यात आला आहे, तो पूर्णपणे चुकीचा आहे. शवविच्छेदनासाठी आमच्या सहायकांनी कुणाकडूनही पैसे घेतलेले नाहीत." - डॉ. अभिषेक हिंगे, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय पोंभूर्णा. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर