शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

नुकसान भरपाई देण्याची मागणी

By admin | Updated: July 16, 2016 01:21 IST

तालुक्यातील मानोरा परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भाताची शेती करतात. रोवणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी पऱ्ह्याची लागवड केली.

तहसीलदारांना निवेदन : मानोरा परिसरात भाताचे नुकसान बल्लारपूर : तालुक्यातील मानोरा परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भाताची शेती करतात. रोवणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी पऱ्ह्याची लागवड केली. मात्र संततधार पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना फटका बसला आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी मानोरा येथील सरपंच सविता धोडरे यांनी बुधवारी तहसीलदार विकास अहीर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. बल्लारपूर तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ११३२.२१ मिमी इतके आहे. जून-जुलै महिन्यात आजतागायत ९२० मिमी इतके पर्जन्यमान झाले आहे. पाच दिवसांच्या संततधार पावसाने मानोरा परिसरातील भाताचे पऱ्हे नेस्तनाबूत झाले. यामुळे या भागातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. भाताची रोवणी करण्यासाठी दुबार पऱ्हे टाकण्याची वेळ आली आहे. बी-बियाणे, खते, मजुरी व शेतीच्या मशागतीचा खर्च दुसऱ्यांदा करावा लागणार आहे. यामुळे मानोरा परिसरातील धान उत्पादक शेतकरीवर्ग पुरता संकटात सापडला आहे. मानोरा भागात मुख्य व्यवसाय शेतीचा असून गावाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असल्याने हातात येणारे पीक नष्ट झाले. परिणामी शेतकरी बांधव हवालदिल झाले आहेत. दुबार पेरणी करण्यासाठी बी-बियाणे व आर्थिक मदत पीडित शेतकऱ्यांना देण्याची मागणी तहसीलदार विकास अहीर यांना दिलेल्या निवेदनातून मानोरा येथील सरपंच सविता धोडरे यांनी केली आहे. शिष्टमंडळाचे नेतृत्व बल्लारपूर पंचायत उपसभापती अनेकश्वर मेश्राम यांनी केले. यावेळी माजी सभापती अ‍ॅड. हरिश गेडाम, मानोरा येथील सरपंच सविता धोडरे, दहेलीचे सरपंच ज्ञानेश्वर टेकाम, कोर्टीमक्ताचे उपसरपंच गोविंदा उपरे, धोडरे व परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)