शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भद्रावतीत आढळला डेल्टा प्लसचा रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 05:00 IST

शहरातील फुलेनगर सुमठाणा येथील ४० वर्षीय महिलेला एका महिन्यापूर्वी कोरोना झाला होता. या महिलेचे रक्ताचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. तब्बल एक महिन्यानंतर रक्ताचा अहवाल डेल्टा प्लस आढळून आल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. या महिलेची प्रकृती ठणठणीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : शहरात डेल्टा प्लसचा एक रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी नगर परिषद सभागृहात तातडीची आढावा बैठक घेतली.शहरातील फुलेनगर सुमठाणा येथील ४० वर्षीय महिलेला एका महिन्यापूर्वी कोरोना झाला होता. या महिलेचे रक्ताचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. तब्बल एक महिन्यानंतर रक्ताचा अहवाल डेल्टा प्लस आढळून आल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. या महिलेची प्रकृती ठणठणीत आहे. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी नगर परिषद सभागृह, भद्रावती येथे तातडीची बैठक बोलावली. यावेळी उपविभागीय अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, तहसीलदार महेश शितोळे, मनीष सिंग, मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर आदी उपस्थित होते. या रुग्णाची प्रकृती ठणठणीत असली तरी या परिसरात कॅम्प लावून नागरिकांची तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे गरज असल्याचे डॉ. मनीष सिंग यांनी ‘लोकमत’ला सांगितले. डेल्टा प्लसचा रुग्ण आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डेल्टा प्लस व्हेरियंट हा काळजी करण्याजोगा असल्याचे जाहीर केले. मात्र, या व्हेरियंटमुळे तिसरी लाट येऊ शकते हे सांगणारी कोणतीही आकडेवारी अजून उपलब्ध नाही, अशी माहिती एका वैद्यकीय अधिकाऱ्याने दिली. कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यात लस घेणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

आरोग्य यंत्रणा जाणून घेत आहे रूग्णाची हेल्थ हिस्ट्रीकोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असतानाच 'डेल्टा प्लस' आढळल्याने आरोग्य विभागही सतर्क झाला. या व्हेरियंटने ग्रस्त रुग्णाने कुठे प्रवास केला. रूग्णाचे लसीकरण झाले होते का, कोरोनाची पुन्हा लागण झाली होती का ? आदी माहिती आरोग्य यंत्रणा जाणून घेत आहे.

नागरिकांनी मनात भीती ठेऊ नयेभद्रावती शहरातील एका रूग्णाचा अहवाल डेल्टा प्लसचा पॉझिटिव्ह आला. खबरदारी म्हणून वरोरा शहर व तालुक्यात आरोग्य जागृती, लसीकरण व कॉन्ट्रक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात येणार आहे. वरोरा शहरात सारीचे सर्वेक्षणही करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांनी कोणतीही शंका वा भीती मनात ठेऊ नये. कोरोना प्रतिबंधक उपाययाेजनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.-अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी, चंद्रपूर 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या