शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

राज्याचा कर चुकवून दिल्लीची रुग्णवाहीका धावायची चंद्रपुरात

By परिमल डोहणे | Updated: September 15, 2024 17:24 IST

वेकोलिचा प्रताप : आरटीओने केली रुग्णवाहीका जप्त

चंद्रपूर: परऱ्यातील वाहन चालवायचे असेल तर त्या राज्याचा कर भरणे आवश्यक असते. मात्र वेकोलीने दिल्लीच्या एका कंपनीची कंत्राट करून रुग्णवाहिका सुरू केली. चंद्रपुरात ही रुग्णवाहिका धावन्यासाठी राज्याचा कर भरणे आवश्यक होते. मात्र वेकोलीने कंत्राट दिलेल्या कंपनीने याकडे दुर्लक्ष केले. ही बाब प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांच्या लक्षात येताच त्यांनी ती रुग्णवाहिका जप्त करून थकीत कर भरण्याचा नोटीस बजावली आहे. या कारवाईने अनधिकृतरीत्या धावणाऱ्या वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत. 

वेकोलीला सीएसआर फंडातून स्थानिक नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे क्रमप्राप्त असते. त्या अनुषंगाने विकोलिने रुग्णवाहिका सेवा सुरू केली. मात्र यासाठी वेकोलीने स्थानिकांना डावलून दिल्लीच्या पी एस फिनरल अँड ऍम्ब्युलन्स प्रा. लि या कंपनीची करार करून   एच आर 69 ई 5598 क्रमांकाची रुग्णवहीका सुरु केली. 

मार्च 2023 पासून ही रुग्णवाहिका चंद्रपुरात धावत होती. नियमानुसार याबत आरटीओ यांना माहिती देऊन महाराष्ट्र वापर कर भरणे गरजेचे होते. मात्र वेकोलीने याकडे दुर्लक्ष केले. ही बाब आरटीओच्या पथकाच्या लक्षात येतात त्यांनी रुग्णवाहिका क्रमांक  एच आर 69 ई 5598 ची पाहणी केली यावेळी मार्च 2023  पासूनचा 37 हजार 800 रुपयांचा कर थकीत आढळून आला. त्यामुळे आरटीओने ती रुग्णवाहीका जप्त करून थकित कर त्वरित भरण्याचे आदेश पत्राद्वारे दिले आहेत. 

बॉक्स 

रुग्णवाहिकेचा व्यावसायिक वापर

महाराष्ट्र शासनाच्या 21 जुले 2021 च्या अधिसूचनेनुसार अनु क्रमांक 7 नुसार रुग्णवाहिका संवर्गातील वाहनांना ना नफा ना तोटा या तत्त्वावर  उपयोग करणाऱ्या वाहणास कर सवलत आहे. परंतु सदर रुग्णवाहिकेचा व्यवसायिक वापर होत असल्याचे आरटीओच्या निदर्शनास आले. त्यामुळे या वाहनाला राज्य शासनाचा कर भरणे अनिवार्य आहे. त्यामुळे आरटीओने हे वाहन जप्त करून कर भरण्याचा नोटीस बजावली आहे.

 परराज्यातील वाहनाला त्या राज्यातील स्थानिक कर भरणे अनिवार्य असते. सदर रुग्णवाहीकेचा व्यावसायिक वापर सुरु होता. तसेच मार्च 2023 पासून महाराष्ट्र वापर कर थकीत होता. त्यामुळे त्या वाहणाला कर भरण्याबाबतची नोटीस बजावली. तसेच महाराष्ट्र टॅक्स तपासूनच वाहने भाडेतत्त्वावर घेण्याबाबत वेकोलीला पत्र दिले आहे. इतर ज्या वाहनाचा कर थकीत असेल त्यांनी तो लगेच भरून घ्यावा. अन्यथा कारवाही केली जाईल. - किरण मोरे प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रपूर

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर