विसोरा : पाऊस कमी पडल्याने धानपीक व इतर पिके करपायला लागली आहेत. त्यामुळे विसोरासह संपूर्ण देसाईगंज तालुका तसेच गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा व सामान्य जनतेसाठी विविध योजना लागू कराव्या, या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने विसोरा-शंकरपूर-विठ्ठलगाव-पोटगाव-विहीरगाव-मोहटोला-किन्हाळा मार्गे पदयात्रा काढण्यात आली. विसोरा येथील बसस्थानकावरून पदयात्रेला प्रारंभ झाला. सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने सत्तेवर येण्याआधी जी आश्वासने दिले होती. ती आश्वासने सत्तेवर आल्यानंतर पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे. विशेष करून शेतकऱ्यांचे बेहाल होत असताना सरकार गप्प बसून आहे. पाऊस कमी पडल्याने शेकडो हेक्टरवर जमीन पडीत आहे. ज्या शेतकऱ्यांनी धान रोवले आहे, सदर धान सुद्धा पावसाअभावी अडचणीत आले आहे. धानाला अत्यंत कवडीमोल भाव देऊन शासन शेतकऱ्यांची लुबाडणूक करीत आहे. ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करावे, आदी मागण्यांसाठी पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेचे नेतृत्व काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, माजी आ. आनंदराव गेडाम, परसराम टिकले, विलास ढोरे, नितीन राऊत, विनायक वाघाडे, राजू रासेकर, हसनअली गिलानी, कुणाल राऊत, रजनीकांत मोटघरे, शहजाद शेख, राजू गारोदे, महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले.
देसाईगंज तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा
By admin | Updated: October 20, 2015 01:27 IST