शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ वाघाची वनविभागाला हुलकावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2022 23:16 IST

वनविभागाने बुधवारपासून ढोरपा पाहार्णी शिवारात हल्लेखोर वाघ नेमका तोच आहे का, याची खातरजमा करण्यासाठी ट्रॅप कॅमेऱ्यांच्या माध्यमातून या वाघाची पडताळणी सुरू केली आहे. यासाठी ठिकठिकाणी १५ ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. बुधवारपासून वनविभागाचे कर्मचारी आणि अधिकारी या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाघाचा मागोवा घेत आहेत.  शिवाय त्या परिसरात कर्मचाऱ्यांची गस्तही सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : गेल्या महिनाभरात ढोरपा पाहार्णी परिसरात धुमाकूळ घालून दोघांचा बळी व तिसऱ्या महिलेवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या त्या वाघाची पडताळणी वनविभागाने सुरू केली आहे. मात्र पडताळणीच्या दुसऱ्या दिवशीही त्या वाघाने हुलकावणी दिली.वनविभागाने बुधवारपासून ढोरपा पाहार्णी शिवारात हल्लेखोर वाघ नेमका तोच आहे का, याची खातरजमा करण्यासाठी ट्रॅप कॅमेऱ्यांच्या माध्यमातून या वाघाची पडताळणी सुरू केली आहे. यासाठी ठिकठिकाणी १५ ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. बुधवारपासून वनविभागाचे कर्मचारी आणि अधिकारी या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाघाचा मागोवा घेत आहेत. शिवाय त्या परिसरात कर्मचाऱ्यांची गस्तही सुरू आहे. मात्र हल्लेखोर वाघ दिसून आला नाही. वनविभागाने गुरुवारी ही शोधमोहीम राबविली. मात्र गुरुवारीही वाघाने हुलकावणी  दिली.  ढोरपा पाहार्णी परिसर हा जंगलव्याप्त आहे. म्हसली, विलम, तेलीमेंढा, कोथुळणा, बालापूर, तोरगाव या गावापर्यंत या जंगलाची व्याप्ती आहे. त्यामुळे या वाघाने आपला मुक्काम कोणत्या गावाकडे हलविला असावा याबाबत विविध तर्क काढण्यात येत आहेत.

गावकरी ॲक्शन मोडवरवनविभागाने येत्या चार दिवसांत या हल्लेखोर वाघाचा बंदोबस्त केला नाही तर ढोरपा पाहार्णी आणि परिसरातील नागरिक वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढून आपला राग व्यक्त करणार आहेत, अशी माहिती मौशीचे सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

ती जखमी महिला कोमातचचार दिवसांपूर्वी वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेली सविता सोमेश्वर भुरले या महिलेवर ब्रह्मपुरी येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र सविता कोमातच असल्याची माहिती सविताच्या नातेवाइकांनी दिली.

 

टॅग्स :Tigerवाघ