शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

भूजल पातळीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:27 IST

मूल तालुक्यात आधी पाण्याची कमतरता नव्हती. मात्र दिवसेंदिवस पाण्याची भिषण समस्या जाणवत आहे. आधी ४०-५० फुटांवर पाणी लागत होते.

ठळक मुद्देपाणी जीरवणे गरजेचे : टंचाईची समस्या उद्भवणार

आॅनलाईन लोकमतमूल : मूल तालुक्यात आधी पाण्याची कमतरता नव्हती. मात्र दिवसेंदिवस पाण्याची भिषण समस्या जाणवत आहे. आधी ४०-५० फुटांवर पाणी लागत होते. मात्र आता विविध स्रोताद्वारे भूगर्भातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होत असल्याने भूजल पातळी दिवसेंदिवस खाली जात आहे. त्यामुळे आधी ४० फूटावर लागणारे पाणी आता १५० ते २०० फुटांवर लागत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नागरिकांना तीव्र पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.मूल तालुक्यातील सभोवतालचा भागात शेतकरी राहात असून या भागातील शेतकरी खरीप व काही शेतकरी रबी अशा दोन्ही हंगामात शेती करतात. भूगर्भात भरपूर पाण्याचे स्त्रोत असल्यामुळे या भागातील काही शेतकरी पाण्याचा उपसा करुन पीक घेतात. तसेच पाण्याचा वापर करणारे व्यावसायिकसुद्धा मुबलक पाण्याचा उपसा करीत असल्यामुळे दिवसेंदिवस पाण्याची पातळी खाली जात आहे. प्रत्येक नागरिक भूगर्भातील पाणी मिळविण्यासाठी वाट्टेल ते प्रयोग करीत असल्याचेही चित्र काही भागात दिसून येते. पूर्वी खोदकाम केले असता विहिरीला भरपूर पाणी लागत होते. मात्र आता हाताने खोदकाम करणाऱ्या विहिरीला पाणीच लागत नाही.पाण्याचा वाट्टेल तसा उपसा होत असतानाही यावर अंकुश नाही. कोणतीही उपाययोजना शासनाकडून केली जात नाही. ‘पाणी अडवा पाणी जीरवा’ ही योजना केवळ कागदावरच राबविली जात असल्याचे दिसून येत आहे. पावसाचे पाणी अडवून भूगर्भात जीरवून पाण्याची पातळी वाढविली जाऊ शकते. मात्र यासाठी शासनासोबतच प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.