नरेश पुगलियांची माहिती : समितीच्या अहवालाची प्रतीक्षा करणारचंद्रपूर : करवाढीविरोधात सुरू असलेले साखळी उपोषण रविवारी २० मार्चला महानगर पालिकेतील सत्ताधाऱ्यांची तेरवी करून समाप्त केले जाईल, अशी माहिती शनिवारी माजी खासदार तथा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांनी उपोषणस्थळी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.१८ मार्चला महानगर पालिकेया विशेष आमसभेत करवाढ स्थगित करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. सत्ताधारी गटाने यासाठी समिती गठित करण्याचा निर्णय घेतला. ही जनविरोधी निती असून त्याचा मी निषेध करतो, असे पुगलिया यावेळी म्हणाले. मनपाने गठित केलेल्या समितीचा जोपर्यंत अहवाल प्राप्त होत नाही, तोपर्यंत नागरिकांनी मनपाचा कर भरू नये, असे आवाहनही पुगलिया यांनी यावेळी केले. जर समितीचा अहवाल समाधानकारक नसेल तर करवाढ विरोधात आपण न्यायालयात याचिका दाखल करू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.वेळ पडल्यास उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयाची दारेही ठोठावू असे, नरेश पुगलिया म्हणाले.भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष वेगळेच काही बोलतात आणि दोन्ही मंत्री वेगवेगळी मते व्यक्त करतात. मनपाने केलेल्या करवाढीच्या विरोधातील लढाई न्यायपालिकेत आणि विधिमंडळात पोहचविली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. या लढ्यात नागरिकांनी सहभागी होण्याची अपेक्षा त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. दरम्यान, शनिवारच्या साखळी उपोषणात चंद्रशेखर पोडे, बाबा मून, कैलास रामटेके, दयानंद राखुंडे, सतीश महाजन, रितेश पंजाबी, सुरेश रोहरा सहभागी झाले होते. रविवारी या आंदोलनाची सांगता होणार आहे. (प्रतिनिधी)
मनपातील सत्ताधाऱ्यांच्या तेरवीने होणार आंदोलनाची सांगता
By admin | Updated: March 20, 2016 00:51 IST