शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

शेतमाल दरवाढीचा निर्णय घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 23:45 IST

शेतमालास भाव नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनावर शेतकºयांचे लक्ष लागून आहे.

ठळक मुद्देहिवाळी अधिवेशन : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधी बोलणार काय?

आॅनलाईन लोकमतगोवरी : शेतमालास भाव नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनावर शेतकºयांचे लक्ष लागून आहे. मात्र, शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या संपन्न करण्यासाठी सरकारने शेतमालाच्या दराबाबत चर्चा करून न्याय द्यावा, अशी मागणी केली जात आहे.सोमवारपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू झाले. दरवर्षी हिवाळी अधिवेशन भरविले जाते. परंतु, शेतकºयांच्या प्रश्नांवर चर्चा न करता भ्रष्टाचार व अन्य मुद्यांवर सभागृहाचा वेळ वाया घालविला जातो. मग शेतकºयांनी दाद मागायची कुणाकडे. आतातरी शेतमालाचा दरवाढीवर राजकीय पुढारी चर्चा करुन शेतकºयांना न्याय मिळवून देतील काय? हेच आता बघायचे आहे, असा प्रश्न समाजमनातून विचारला जात आहे.कृषिप्रधान देशातल्या शेतकऱ्यांची अवस्था आज वाईट असताना सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही. त्यामुळे शेतकरी पुरता काकुळतीला आला आहे. निसर्गाची अवकृपा आणि शेतकऱ्यांची होत असलेली होरपळ हा शेतकºयांच्या चिंतेचा विषय आहे. शेतकरी शेतात दिवसरात्र काबाडकष्ट करतो. परंतु सरकारने शेतमालाला दिलेला दर अतिशय तोकडा आहे. त्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत असून सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवून न्याय देणे अपेक्षीत आहे. तोकड्या दराने शेतकरी कोलमडून गेला आहे. शेतकरी कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात करू लागला. कापूस पिकावर केला जाणारा खर्चही मोठा आहे. पण, कापसाला मिळणारा दर अतिशय अल्प आहे. यावर्षी शासनाने कापूस पिकाला चार हजार ३३० रुपये हमीभाव जाहीर केले. खरेतर दिलेला हमीभाव जाहीर करताना शासनाने दहा वेळा विचार करायला पाहिजे होता. इतर पिकांपेक्षा कापसावरील उत्पादन खर्च खूप मोठा आहे. या तोकड्या हमीभावात शेतकºयांनी कापूस पिकांवर केलेला खर्चही भरुन निघत नाही.हमीभाव जाहीर करताना कापूस उत्पादनावर होणाºया खर्चाचा शासनाने अभ्यास करायला हवा होता. परंतु तसा अभ्यासपूर्ण निर्णय न घेता दरवर्षीप्रमाणे यंदाही तोकडा हमीभाव जाहीर करुन प्रशासन मोकळे झाले. शेतकऱ्यांची आज केविलवाणी अवस्था झाली आहे. त्यांच्या प्रश्नावर कुणीही राजकीय नेते रान उठविताना दिसत नाही. निवडणूक काळात शेतकऱ्यांच्या काळजातून बोलणारे राजकीय पुढारी गेले कुठे? असा संतप्त शेतकऱ्यांचा सवाल आहे. सर्वांनीच शेतकऱ्यांची साथ सोडली आहे. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकºयांच्या आत्महत्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. शेतकरी शेतात दिवसरात्र राबतात परंतु त्यांचे न्याय हक्क तुडविले जात आहेत.शेतकऱ्यांचे अच्छ ेदिन तर सोडाच परंतु शेतकऱ्यांच्या दु:खावरही आज फुंकर घालायला कुणी उरला नाही. शेतकºयांनी एकट्यानेच किती काळ संघर्ष करायचा?शेतकरी दिवसरात्र घडाची काडी करुन शेतात राबतो परंतु त्यांच्या घामाला दाम मिळत नाही. ही या देशातील सर्वात मोठी शोकांतिका आहे. शेतकरी काकुळतीला येऊन मरण पत्करतो आहे. मात्र, शेतकºयांची आर्त हाक कशी कुणाला ऐकू येत नाही? हा प्रश्न आहे. अधिवेशनात शेतकºयांच्या प्रश्नावर सर्व पक्षातील नेत्यांनी आवाज उठवावी, अशी मागणी गावखेड्यांतील शेतकऱ्यांनी केली.बोंडअळीने हजारो शेतकऱ्यांचे नुकसान; भरपाई देण्याची मागणीयावर्षी बोंडअळीने कपासीचे पिके उद्ध्वस्त झाले. विविध रोगांनी ग्रासल्याने यावर्षी पांढऱ्यां सोन्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कपासावरील जिल्ह्यातील सर्व शेतकरी हैराण झाले आहेत. नुकसान भरपाईसाठी कृषी विभागाने शेतकºयांकडून अर्ज मागविले आहे. परंतु, जाचक अटीमुळे शेतकऱ्यांना अर्ज भरणे कठीण झाले. तालुका कृषी अधिकारी कार्यालयात माहिती घेण्यासाठी गेल्यास निराश मनाने परत जाण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची आशा धूसर झाली. यावर्षी कोणत्याच शेतमालाचे भाव वाढले नाही. चंद्रपूर जिल्ह्यात कापूस उत्पादन घेणाºया शेतकºयांची संख्या वाढत आहे. यंदा बोंडअळीने शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले. काही गावांत अजूनही कृषी विभागाचे अधिकारी पोहोचले नाहीत. केवळ आदेश देऊन शेतकºयांची बोळवण करीत आहेत.