घुग्घुस : वेकोलिच्या मुंगोली उपक्षेत्रात कार्यरत वेल्डर सुहास आनंद बोबडे यांच्या डोक्यावर वीज खांब पडल्याने मृत्यू झाला. ही घटना आज सोमवारी दुपारी घडली.मुंगोली उपक्षेत्रीय परिसरात वीज खांब कापण्याचे काम सुरू असताना वेल्डर पदावर कार्यरत सुहास बोबडे (४२) यांच्या डोक्यावर खांब पडला. यात ते जबर जखमी झाले. तिथे असलेल्या सुपरवायझर व एका कामगाराने वेकोलि अधिकाऱ्यांना याची माहिती देऊन तात्काळ वेकोलिच्या स्थानिक दवाखान्यात आणले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सदर घटनेवरून वेकोलि प्रशासन सुरक्षेबाबत कितपत गंभीर आहे, हे दिसून येते. यामुळे कामगारामध्ये संताप व्यक्त होत होता. (वार्ताहर)
वीज खांब पडून वेकोलि कामगाराचा मृत्यू
By admin | Updated: November 3, 2015 00:17 IST