शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

गोजोली आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 22:48 IST

गोंडपिपरी येथून सात किमी अंतरावर असलेल्या गोजोली येथील श्रीराम आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा अकस्मात मृत्यू झाला. ही घटना बुधवारी घडली. भीमराव लालसू गावडे असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे. तो कोठी ता. भामरागड येथील रहिवासी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवढोली : गोंडपिपरी येथून सात किमी अंतरावर असलेल्या गोजोली येथील श्रीराम आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा अकस्मात मृत्यू झाला. ही घटना बुधवारी घडली. भीमराव लालसू गावडे असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे. तो कोठी ता. भामरागड येथील रहिवासी आहे.गोजोली येथे श्रीराम आदिवासी प्राथमिक तथा माध्यमिक विद्यालय असून विविध तालुक्यातील ३६० विद्यार्थी येथे शिकतात. सदर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची जुळवाजुळव करण्याकरिता येथील शिक्षक हे गोंडपिपरीपासून १५० कि. मी. अंतरावर असलेले आदिवासीबहुल तालुके भामरागड, सिरोंचा, एटापल्ली, अहेरी येथून विद्यार्थी आणतात. १ ते १० वर्ग असलेल्या या आश्रमशाळेतील भामरागड तालुक्यातील कोठी येथील आठ वर्षीय विद्यार्थ्यांचा मंगळवारी शाळेतच आकस्मिक मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.मृतक भीमराव गावडे हा दुसऱ्या वर्गात शिकत असून तो हुशार विद्यार्थी होता.मंगळवारी भीमरावला सर्दी व ताप आल्याची माहिती तेथील मुख्याध्यापक डी. आर. गडेकर यांना मिळाली. लगेचच त्याला शाळेतून गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेऊन उपचार करण्यात आले. दुसºया दिवशी सकाळी ८.३० वाजता शाळेच्या अभ्यास पाळीतसुद्धा भीमराव हा व्यवस्थितपणे अभ्यासाला बसला. काही वेळात अचानक त्याला चक्कर आली व तो खाली पडला. तेथील कर्मचाºयांनी लगेच त्याला गोंडपिपरीच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.मंगळवारी भीमरावला अचानक ताप आला व त्याला रुग्णालयातसुद्धा उपचारासाठी नेले होते. दरम्यान, बुधवारी तो शाळेत चक्कर येऊन पडला. परत उपचारासाठी गोंडपिपरीला आणले असता त्याचा दुदैवी मृत्यू झाला. आम्ही नेहमीच विद्यार्थ्यांची काळजी घेतच असतो. भीमरावच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळलेले नाही.-डी. आर. गडेकर, मुख्याध्यापक.