शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यात कोठारी वनक्षेत्रात पट्टेदार वाघाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 14:21 IST

शुक्रवारी सकाळी कोठारी वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या बामणी येथील एका शेतात एक पट्टेदार वाघ जखमी अवस्थेत आढळून आला. वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचेपर्यंत सदर वाघाचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देबामणी शिवारातील घटनागावकऱ्यांना जखमी अवस्थेत आढळला होता

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोठारी वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या बामणी येथील एका शेतात एक पट्टेदार वाघ जखमी अवस्थेत आढळून आला. शुक्रवारी सकाळी हा प्रकार समोर आला. याची माहिती वनविभागाला देण्यात आले. वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचेपर्यंत सदर वाघाचा मृत्यू झाला. सदर वाघ एक वर्ष वयाचा असून रानडुकरासोबतच्या झुंजीत तो गंभीर झाला असावा, असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.कोठारी वन परिक्षेत्रातील बामणी गावातील पुंडलिक मडावी हे शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास आपल्या शेतात भाजीपाला पिकाची पाहणी करण्याकरिता गेले होते. अचानक त्यांना वांग्यांच्या झाडामध्ये पट्टेदार वाघ झोपून असल्याचे दिसले. यामुळे पुंडलिक मडावी हे घाबरून गेले. लगेच त्यांनी गावाकडे धूम ठोकत गावकऱ्यांना याची माहिती दिली. गावकऱ्यांनी तत्काळ मडावी यांच्या शेतात येऊन पाहणी केली असता सदर वाघ जखमी अवस्थेत पडून असल्याचे दिसले. गावकऱ्यांनी भ्रमणध्वनीद्वारे याची माहिती वनरक्षक टेकाम यांना दिली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाघावर जाळी टाकून त्याला संरक्षण दिले. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. मुख्य वनसंरक्षक रामाराव, मध्यचांदाचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे, कोठारीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप लंगडे हे घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत जखमी वाघाचा मृत्यू झाला होता. सदर वाघ एक वर्ष वयाचा असून रानडुकराच्या झुंजीत तो जखमी झाला असावा, असा अंदाज आहे. वाघाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृत्यू नेमके कारण कळू शकेल.

टॅग्स :Tigerवाघ