शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ जखमी वाघाचा अखेर मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 21:48 IST

भद्रावती तालुक्यातील चारगाव खुल्या कोळसा खाणीलगत असलेल्या शिरणा नदीच्या पुलाखाली जखमी अवस्थेतील वाघाचा वनविभागाच्या डोळ्यादेखत तब्बल १९ तासानंतर दुर्दैवी मृत्यू झाला.

विनायक येसेकर/राजेश रेवते ।लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती (चंद्रपूर) : तालुक्यातील चारगाव खुल्या कोळसा खाणीलगत असलेल्या शिरणा नदीच्या पुलाखाली जखमी अवस्थेतील वाघाचा वनविभागाच्या डोळ्यादेखत तब्बल १९ तासानंतर दुर्दैवी मृत्यू झाला.सदर वाघाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो पुलाखाली नदीच्या पात्रात पडला. डोक्याला गंभीर दुखापत होऊन मेंदूतून रक्तस्राव वाढला. अशातच वाघाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे. जखमी वाघाला बाहेर काढण्यात वनविभाग कमी पडल्याने वाघावर उपचार होऊ शकले नाही. या बाबीला वनविभागाने पद्धतशीर फाटा देत बचावात्मक पवित्रा घेतल्याचे दिसून येते. सदर वाघ हा नर असून पाच वर्षांचा होता.तालुक्यातील तेलवासा, कुन्हाळा, चारगाव, ढोरवासा या जुन्या कोळसा खाणीच्या परिसरात या वाघाने आपले वास्तव्य निर्माण केले होते. बुधवारी हा वाघ शिरणा नदीच्या पात्रात एका दगडाखाली असल्याचे तेथील काही नागरिकांना दिसला. या वाघाला मंगळवारी रात्री अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो नदीपात्रात पडला. त्याच्या मेंदूला जबर मार असल्याने तो तिथून इतरत्र जाऊ शकला नाही. माहिती होताच घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती म्हैसेकर आपल्या ताफ्यासह दाखल झाल्या. बुधवारी सकाळी ८ वाजतापासून त्या वाघाला जिवंत बाहेर काढण्यासाठी वनविभाग तसेच इको प्रो संघटनेचे शर्थीचे प्रयत्न चालू होते. नदीपात्रातील ज्या दगडाखाली वाघ होता त्या परिसरात जाणे कठीण असल्याने वेकोलिच्या माध्यमातून त्या परिसरात रस्ता तयार करून क्रेन उतरविण्यात आली व त्याच्या सहाय्याने पिंजरा त्या वाघाच्या समोर ठेवण्यात आला. मात्र वाघ सदर पिंजऱ्यात आला नाही. तो पाण्यातच बराच वेळ फिरत होता. वन कर्मचाऱ्यांनी त्याच्याजवळ फटाके फोडून हुसकावण्याचा प्रयत्न केला. परंतु जबर जखमी असल्याने तो पाण्यातून बाहेर निघू शकला नाही. रेस्क्यूदरम्यान घटनास्थळी डीएफओ सोनकुसरे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. वाघ जखमी व नदीपात्रात असल्याने वनाधिकाऱ्यांना वाघाला रेस्क्यू करता आले नाही. दरम्यान, रात्री १ वाजताच्या सुमारास वाघाचा मृत्यू झाला. त्यानंतर इको-प्रो संघटनेच्या सदस्यांमार्फत वाघाचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण खोब्रागडे, डॉ. शेडमाके, डॉ. जांभुळे यांनी वाघाचे शवविच्छेदन केले. अज्ञात वाहनाच्या धडकेने वाघाच्या डोक्याला जबर दुखापत झाली. मेंदूला मार लागून रक्तस्राव सुरू झाला. रक्तस्राव वाढल्याने वाघाचा मृत्यू झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.वनविभागाच्या नियोजनाअभावी वाघाचा मृत्यूगेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात चिमूर वनपरिक्षेत्रातील भान्सुली बिटात तलावाच्या बाजूला ‘येडा अण्णा’ नावाचा वाघ उपचाराअभावी तडफडून मरण पावला. वाघाचा मृत्यू झाल्यानंतर त्यावर उपचार करण्याची अनुमती आली होती; तोपर्यंत वेळ निघून गेली होती. या घटनेची पुनरावृत्ती शिरणा नदीत जखमी अवस्थेत असलेल्या वाघाच्या घटनेवरून झाली आहे. हा वाघही वनविभाग येईल आणि आपल्यावर उपचार करेल, याची वाट पाहात होता. मात्र वनविभाग आला खरा मात्र तो केवळ वाघाच्या जखमा हेरू शकला नाही. उपचार तर दूरच राहिला. जेरबंद करण्यासाठी पिंजरा सोडला. मात्र नियोजनाच्या अभावामुळे वाघ त्या पिंजवनविभागाच्या नियोजनाअभावी वाघाचा मृत्यूत जाऊ शकला नाही. वनविभाग आपल्या प्रयत्नात मश्गुल असतानाच वाघाने अखेर जगाचा निरोप घेतला.सदर वाघाला अज्ञात वाहनाने समोरून धडक दिली. यात त्याच्या मेंदूला दुखापत झाली. मेंदूतून रक्तस्राव वाढल्याने पोटातही रक्तस्राव सुरू झाला. त्यामुळे वाघाचा मृत्यू झाला. स्वाती म्हैसेकर,वनपरिक्षेत्र अधिकारी, भद्रावती.चारगाव येथील शिरणा नदीच्या पात्रात पडलेला वाघ ७ नोव्हेंबर रोजी मृत झाल्याचे दिसून आले. प्राथमिक अंदाजानुसार वाघाचा मृत्यू अंतर्गत रक्तस्रावामुळे व पाण्यात बुडाल्याने झालेला असून वाघाचे शवविच्छेदन करून दहन करण्यात आले. ए.एल. सोनकुसरे, विभागीय वन अधिकारी, चंद्रपूररेस्क्यूदरम्यान मीदेखील घटनास्थळी होतो. वाघ ज्या ठिकाणी होता, तिथे त्याला ट्रॅक्यूलाईझ करणे अवघड होते. बेशुद्ध झाल्यानंतर त्याचा पाण्यात बुडून मृत्यू निश्चित होता. वाघ आक्रमक आणि खवळलेला असल्याने त्याला जाळ्यात पकडणेदेखील शक्य नव्हते. यात एखाद्याचा बळी जाण्याची शक्यता होती. त्यामुळे वनाधिकाऱ्यांसमोर त्याला पिंजऱ्यात पकडण्याशिवाय पर्याय नव्हता. प्रकाश कामडेअध्यक्ष, सार्ड संस्था, चंद्रपूर.वाघ जखमी होता आणि ज्या ठिकाणी होता, तिथून त्याला पिंजऱ्यात पकडणे हाच एकमेव मार्ग होता. त्याच मार्गाने वाघाला रेस्क्यू करण्यात येत होते. मात्र याला वाघाने प्रतिसाद दिला नाही. वाघाला जाळ्यात पकडणे शक्य नव्हते. ट्रॅक्यूलाईझ केल्यानंतर वाघ १५ मिनिटानंतर बेशुद्ध होतो. तो पाण्याजवळ असल्याने त्याला ट्रॅक्यूलाईझ करणेही शक्य नव्हते.बंडू धोतरे,मानद वन्यजीव रक्षक तथा अध्यक्षइको प्रो, चंद्रपूर.

टॅग्स :TigerवाघDeathमृत्यू