पोंभुर्णा तालुक्यातील चक नवेगाव गावाजवळील नाल्यावरून कमी पावसातही पाणी वाहत असते. गावात जाण्यासाठी दुसरा मार्ग नसल्याने गावकऱ्यांना व नवेगाव मोरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी जाणाऱ्यांना जीव धोक्यात घालून पूल पार करावा लागतो. दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने सोमवारी या पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे काही नागरिकांनी जीव धोक्यात घालून पूल पार केला.
धोकादायक प्रवास
By admin | Updated: September 14, 2016 00:42 IST