शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

रेल्वे फाटकातून धोकादायक वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 06:00 IST

चंद्रपूर जिल्ह्यात पोंभूर्णा, गोंडपिपरी, जिवती व सावली तालुका सोडला तर सर्वच ठिकाणी रेल्वेचे जाळे पसरले आहे. अनेक ठिकाणी रेल्वे फाटक लावले आहेत. तर काही रेल्वे क्रासींग मानवरहित आहेत. चंद्रपुरात बाबुपेठ रेल्वे फाटक अलिकडे असेच धोकादायक झाले आहे. एकाच ठिकाणी एक्सप्रेस व बीएनआर रेल्वे लाईनचे दोन फाटक आहेत. दिवसातून अनेकदा हे फाटक बंद राहत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देदुर्लक्षच घेताहेत बळी : मानवरहित रेल्वे क्रॉसिंगही धोक्याचेच

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दळणवळणाचे अनेक साधने आहेत. असे असले तरी रस्त्यावरून वाहतूक करण्यास रेल्वेला प्रथम प्राधान्य देण्यात येते. मात्र रेल्वे फाटक बंद असतानाही वाहनधारकांची बंद फाटकातून धोकादायक वाहतूक सुरू आहे. यात अनेकांचे बळी गेले आहेत. तरी हा प्रकार थांबलेला नाही. याशिवाय जिल्ह्यात असलेल्या मानवरहित रेल्वे क्रासींगही धोक्याचेच ठरत आहे.चंद्रपूर जिल्ह्यात पोंभूर्णा, गोंडपिपरी, जिवती व सावली तालुका सोडला तर सर्वच ठिकाणी रेल्वेचे जाळे पसरले आहे. अनेक ठिकाणी रेल्वे फाटक लावले आहेत. तर काही रेल्वे क्रासींग मानवरहित आहेत. चंद्रपुरात बाबुपेठ रेल्वे फाटक अलिकडे असेच धोकादायक झाले आहे. एकाच ठिकाणी एक्सप्रेस व बीएनआर रेल्वे लाईनचे दोन फाटक आहेत. दिवसातून अनेकदा हे फाटक बंद राहत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. या त्रासातूनच अनेक वाहनधारक फाटक बंद असतानाही लोखंडा रॉङखालून आपली दुचाकी वाहने काढून पुढे जातात. एका वाहनधारकाने हा प्रकार केला की लगेच दुसरा करतो, मग तिसरा, चौथा, अगदी भरधाव रेल्वे जवळ येईपर्यंत हा प्रकार सुरूच असतो. या धोकादायक प्रकार बाबुपेठमध्ये अनेकदा अंगलट आला आहे. आता या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. त्यामुळे काही दिवसात येथील समस्या सूटणार आहे.वरोरा तालुक्यात चैन्नई- नवीदिल्ली रेल्वे मार्ग जातो. ही रेल्वे लाईन रेल्वे गाड्यांच्या अवागमनाने नेहमी व्यस्त असते. या रेल्वे लाईनवर मोहबाळा, डोंगरगाव (रे.), नागरी या गावाजवळ रेल्वे गेट आहे. यातील डोंगरगाव व नागरी या रेल्वे गेटवरही वाहनधारकांकडून हाच कित्ता गिरवला जातो. गेट बंद असताना येथूनही वाहने कसरत करीत काढली जातात. मूल, सिंदेवाही, राजोली, मारडा, कोंढा, ताडाळी, राजुरा, नागभीड, भद्रावती या तालुक्यातही बंद रेल्वे फाटकातून अव्याहतपणे वाहनांची वाहतूक सुरू राहते. उंच असलेले ट्रक व क्षमतेपेक्षा अधिक भार वाहणारे ट्रक रेल्वे लाईनमध्ये अडून धोका होण्याची शक्यता मोहबाळा रेल्वे गेटवर अधिक आहे.या गेटमधून औद्योगिक वसाहतीमधील उद्योगात ट्रक जात असतात. जिल्ह्यात नागभीड, भद्रावती, वरोरा व चंद्रपूर तालुक्यात अनेक ठिकाणी मानवरहित रेल्वे क्रासींग आहेत. गडचांदूर परिसरातील कुट्रा व नागभीड तालुक्यातील अड्याळ टेकडी रेल्वे क्रासींग प्रचंड धोकादायक आहे.दरवाजाचे फाटक होऊ शकतो उपायसाधारणत: लोखंडी रॉड खाली पाडून फाटक बंद केले जाते. त्यामुळे या रॉडखालून वाहनधारक आपल्या गाड्या काढण्याचे अनाठायी धाडस करतात. याऐवजी अशा रेल्वे क्रासींगवर दोन दरवाजाचे गेट बसविले तर तिथून वाहन काढणे वाहनधारकांना शक्य होणार नाही .उपस्थित कर्मचाऱ्यांना देणेघेणे नाहीचंद्रपुरातील बाबपुठे फाटक असो की जिल्ह्यातील कुठलाही रेल्वे फाटक असो. तिथे २४ तास कर्मचारी तैनात असतो. या कर्मचाºयाच्या डोळ्यादेखत बंद फाटकातून वाहनधारक धोकादायक क्रासींग करतात. मात्र कर्मचाऱ्यांकडून त्यांना साधे हटकलेही जात नाही. जणू त्यांना त्याचे काही देणेघेणेच नसावे.

टॅग्स :railwayरेल्वेTrafficवाहतूक कोंडी