शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

चंद्रपुरातील नद्यांमध्ये कर्तव्यशून्यतेची घाण

By admin | Updated: December 10, 2014 22:53 IST

चंद्रपूर व परिसरातील अनेक गावांना जीवन देणारे चंद्रपुरातील जलस्रोत चंद्रपूरकरांनीच घाण केले. तहान भागविणाऱ्या या नद्यांविषयी कृतज्ञता बाळगण्याऐवजी नागरिकच कृतघ्न झाले.

रवी जवळे - चंद्रपूरचंद्रपूर व परिसरातील अनेक गावांना जीवन देणारे चंद्रपुरातील जलस्रोत चंद्रपूरकरांनीच घाण केले. तहान भागविणाऱ्या या नद्यांविषयी कृतज्ञता बाळगण्याऐवजी नागरिकच कृतघ्न झाले. वेकोलिचे ओव्हरबर्डन, नागरिकांचे अतिक्रमण व दिवसागणिक वाढत जाणारा गाळ, यामुळे या नद्यांचे नैसर्गिक सौंदर्यच बाधित झाले. या नद्यांना स्वच्छ करून प्रवाह सुरळीत करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला होता. मात्र प्रशासकीय यंत्रणेलाच या निर्णयाचा विसर पडल्याने चंद्रपुरातील इरई व झरपट नद्यांना पवित्र करणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.चंद्रपूर शहर आधीच हॉट सिटी म्हणून गणले जाते. त्यामुळे या शहराच्या पालनपोषणासाठी पाण्याची गरज सर्वाधिक महत्त्वाची आहे. चंद्रपुरातून इरई व झरपट नदी वाहते. या नद्याच शहराचे महत्त्वाचे पाण्याचे स्रोत आहे. चंद्रपूरसारख्या उष्ण शहरात दोन नद्या वाहत असतानाही या नद्याचे जतन प्रशासन करू शकले नाही. इरई नदीची सध्याची स्थिती अत्यंत केविलवाणी झाली आहे. नदी आहे की गटारगंगा हेच कळणासे झाले आहे. चंद्रपूर व परिसरातील गावांमध्ये वेकोलिच्या खाणी आहेत. या खाणीचे महाकाय ओव्हरबर्डन इरई नदीपात्राच्या काठावर एखाद्या राक्षसासारखे उभे आहेत. ओव्हरबर्डनने नदीचा नैसर्गिक प्रवाहच गिळंकृत केला आहे. याशिवाय या नदीपात्रात नागरिकांनी अतिक्रमणही केले आहे. विशेष म्हणजे, या नदीच्या पात्रात वर्षानुवर्ष साचलेला गाळ उपसण्याचे सौजन्य आजवर प्रशासनाने व पर्यायाने शासनाने दाखविले नाही. इरई वाचावी म्हणून काही पर्यावरणवाद्यांनी नदी पात्रातच बसून आंदोलन केले आहे. मात्र प्रशासनाला कधी जाग आली नाही. बल्लारपूर पेपरमीलमधील रसायनयुक्त पाणी या नदीत सोडल्यामुळे नदीचे पात्रच काही ठिकाणी विषारी झाले आहे. झरपट नदी तर पूर्वी चंद्रपूरची जीवनदायिनी होती. मात्र या नदीचा डोळ्यादेखत नाला करून टाकला आहे. झरपट नदी वाचविण्यासाठी एकाही राजकीय नेत्याने वा प्रशासकीय अधिकाऱ्याने धडपड केली नाही. उलट ती प्रदूषित करणाऱ्यांकडे मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. शहरातील सुमारे ६० टक्के मलवाहिन्या झरपटमध्येच विलीन करून स्थानिक राज्यकर्त्यांनी संपूर्ण नदीचे वाटोळे केले आहे. १५ कि.मी. एवढी कमी लांबी असतानाही या नदीचे जिल्हा प्रशासन जतन करू शकले नाही. या नदीतून वाळूचा मोठ्या प्रमाणात उपसा करण्यात आला. पात्रातील बारीकसारिक खडकंही गायब करण्यात आले. आता तर नदीपात्रात अनेक ठिकाणी वाळूच दिसत नाही. वाळूऐवजी चिखल, घराघरातून आणि नालीतून आलेल्या मळाचे साम्राज्य दिसते. शहरातील अनेक भागातील सांडपाणी नदीत सोडले जाते. मच्छीनाल्याचेही काही पाणी झरपट नदीतच मिसळते. याशिवाय शहरातील कचरा, निर्माल्य, प्लास्टिक पिशव्याही नदीतच टाकल्या जातात. दरम्यान काही महिन्यांपूर्वी या नद्यांची स्वच्छता करणे, गाळ उपसणे, खोलीकरण करणे याबाबत प्रशासकीय स्तरावरून विचार झाला होता. नदी संवर्धन योजनेंतर्गत केंद्र शासनाने यासाठी निधी द्यावा, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रस्तावही पाठविण्यात येणार होता. मात्र उदासीन प्रशासनाला याचा आजही विसर पडला आहे.