शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

चंद्रपुरातील 30 टक्के घरात आढळली डेंजर डासांची अंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2022 05:00 IST

मनपा आरोग्य विभागामार्फत एमपीडब्लू, एनएम व आशा वर्करद्वारा डासअळी उगमस्थाने शोधून नष्ट करण्यासाठी कंटेनर सर्वेक्षण राबविला जात आहे. सर्वेक्षणअंतर्गत आतापर्यंत १० हजार ८८५ घरांची तपासणी करण्यात आली. यात ३० टक्के घरांत डासांची अंडी आढळली आहेत. हे प्रमाण मोठे असल्याने सर्वांनीच सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. डेंग्यूचा डास हा स्वच्छ व साचलेल्या पाण्यात आढळतो. त्यामुळे आपल्या घराची तपासणी करा. कूलर, टायर, भंगारातील वस्तू, डबे यात पाणी साचणार नाही, याची काळजी घ्या.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : डेंग्यू व इतर कीटकजन्य आजारांचा उद्रेक टाळण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत घरोघरी केल्या जाणाऱ्या कंटेनर सर्वेक्षणात ३० टक्के घरांमध्ये डासांची अंडी आढळली आहेत. आता पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. डेंग्यू व इतर कीटकजन्य आजार पसरू नयेत, या दृष्टीने मनपा प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे. मात्र, नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.मनपा आरोग्य विभागामार्फत एमपीडब्लू, एनएम व आशा वर्करद्वारा डासअळी उगमस्थाने शोधून नष्ट करण्यासाठी कंटेनर सर्वेक्षण राबविला जात आहे. सर्वेक्षणअंतर्गत आतापर्यंत १० हजार ८८५ घरांची तपासणी करण्यात आली. यात ३० टक्के घरांत डासांची अंडी आढळली आहेत. हे प्रमाण मोठे असल्याने सर्वांनीच सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. डेंग्यूचा डास हा स्वच्छ व साचलेल्या पाण्यात आढळतो. त्यामुळे आपल्या घराची तपासणी करा. कूलर, टायर, भंगारातील वस्तू, डबे यात पाणी साचणार नाही, याची काळजी घ्या. पाणी साठवण्याची भांडी कोरडी करा, डासअळी आढळल्यास अबेट द्रावण टाका. पाणी साठा मोठा असले, तर त्यात गप्पी मासे टाका. गप्पी मासे पाण्यातील डासांची अंडी खाऊन टाकतात, ज्याने डासांचा प्रादुर्भाव कमी होतो.डेंग्यू हा जीवघेणा आजार असल्याचे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे डासवाढीला प्रतिबंध हाच सर्वात उत्तम उपाय आहे. काळजी घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेने केले.

आजार अंगावर काढू नका- शिळे किंवा उघड्यावरचे माश्या बसलेले अन्न पदार्थ खाऊ नयेत, अन्न पदार्थ व्यवस्थित झाकून ठेवावेत. - हातगाड्यावर, उघड्यावर विकले जाणारे खाद्य पदार्थ खाऊ नयेत. - पावसाळ्यात आजा अंगावर काढू नका, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.

शुद्ध न केलेले पाणी वापरू नकामनपाच्या नळावाटे होणार्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा. बोअरवेल, कॅनॉल, शुद्धीकरण न केलेल्या विहिरीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करू नये. शाळा, महाविद्यालयांना पुरविण्यात येणारे टाकी, पंपवेलची सफाई करावी. प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करावे. उलट्या-जुलाब, विषमज्वर वगैरे विकार झाल्यास वेळीच उपचार घ्यावा.

 

टॅग्स :Healthआरोग्य