शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

धरण आटले, पाणी पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 23:18 IST

गतवर्षी पडलेल्या अत्यल्प पावसामुळे यावर्षी अनेक ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सध्या उन्हाचा पारा ४७ अंशावर पोहोचला असून नदी, नाले कोरडे पडत आहेत. यातच जिल्ह्यातील चार जलाशये पूर्णत: कोरडे पडले असून पाणी समस्या बिकट झाली आहे. पाण्यासाठी अनेक गावात हाहाकार सुरू असून नदी, नाले, जलाशये आटल्याने अनेक गावांची पाणीपुरवठा व्यवस्थाच कोलमडली आहे.

ठळक मुद्देचार जलाशये कोरडी : अनेक गावांची पाणी पुरवठा व्यवस्था कोलमडली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गतवर्षी पडलेल्या अत्यल्प पावसामुळे यावर्षी अनेक ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सध्या उन्हाचा पारा ४७ अंशावर पोहोचला असून नदी, नाले कोरडे पडत आहेत. यातच जिल्ह्यातील चार जलाशये पूर्णत: कोरडे पडले असून पाणी समस्या बिकट झाली आहे. पाण्यासाठी अनेक गावात हाहाकार सुरू असून नदी, नाले, जलाशये आटल्याने अनेक गावांची पाणीपुरवठा व्यवस्थाच कोलमडली आहे.जिल्ह्यातील १० धरणांपैकी चार धरण हे पूर्णत: कोरडे पडले आहेत. यात नलेश्वर, चंदई, चारगाव, लभानसराड या धरणांचा समावेश आहे. या धरणात संकल्पीत उपयुक्त पाणीसाठ्या व्यतीरिक्त आता एकही पाणीसाठा उपलब्ध नाही. तर असोलामेंढा, घोडाझरी, चारगाव, अमलनाला, पकडीगुड्डम, डोंगरगाव, इरई या धरणातही सध्या अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे हे धरणेसुद्धा काही दिवसांत कोरडे पडण्याची शक्यता आहे.सध्या सूर्य आग ओकत आहे. जिल्ह्याचे तापमान ४७ अंशाच्या पार गेले असून या तीव्र उन्हामुळे घसा कोरडा पडून पाण्याची सतत गरज भासत आहे. मात्र पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रणा ज्या ठिकाणी कार्यरत आहेत, त्या ठिकाणी पाणीच वाहत नसल्याने या यंत्रणाही निकामी ठरल्या आहेत.धरणातील पाणीसाठा लगतच्या गावातील नागरिकांसाठी व जनावरांसाठी उपयोगी येत होते. तर काही गावातील पाणी पुरवठा योजनाही धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. मात्र धरणच कोरडे पडल्याने या पाणी पुरवठा योजना आता कुचकामी पडल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ११४२ एवढे आहे. मात्र गतवर्षी सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत कमी पर्जन्यमान झाल्याने यावर्षी पाणीटंचाईचे संकट ओढावले आहे.अनेक गावात पाण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू असून प्रशासनाने काही गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू केला आहे. तर काही गावात अद्यापही टँकर पोहोचले नसल्याने गावकºयांत रोष पसरला आहे.ग्रामीण भागात पाण्यासाठी जीवघेणा संघर्षगतवर्षी पावसाळ्यात अत्यल्प पाऊस पडला. त्यामुळे जलाशये, नदी, तलाव-बोड्या पुर्णपणे भरल्या नाही. आता तर तप्त उन्हामुळे पाण्याचे स्रोत आटत चालले आहे. ग्रामीण भागातील अनेक बोअरवेल्स बंद आहेत. विहिरी आटल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. कोरपना, जिवती तालुक्यात तर पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. असे असले तरी प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना अद्याप करण्यात आलेल्या नाही.धरणातील उपलब्ध पाणीसाठा७ मेच्या नोंदीनुसार सध्यास्थितीत आसोलामेंढा धरणात १४.२५ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. घोडाझरी तलावात २४.९६ टक्के, अमलनाला धरणात १३.४० टक्के, पकडीगुड्डम धरणात ९.७० टक्के, डोंगरगाव धरणात १७.७२ टक्के तर इरई धरणात केवळ १५.५० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. लभानसराड धरण कोरडे पडले असून नलेश्वर धरणात १.२० टक्के तर चारगाव धरणात ६.६८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.