शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

बापरे...! तीन दिवसात जिल्ह्यात वाढले ६५१ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 05:01 IST

रविवारपर्यंत एकूण बाधितांची संख्या दोन हजार ३४४ वर पोहोचली होती. सोमवारच्या २०३ बाधितांमुळे आता एकूण रुग्णसंख्या २५४७ झाली आहे. यातील १२४९ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत तर १२६९ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे. यासोबतच जिल्ह्यात सोमवारी आणखी तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये, बाबुपेठ चंद्रपूर येथील ५५ वर्षीय पुरूष बाधिताचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देआरोग्य यंत्रणा तणावात : आणखी तिघांचा मृत्यू, नव्या २०३ मध्ये एकट्या चंद्रपूर शहर व परिसरात आढळले १२२ रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना संसर्गाने उद्रेक करणे सुरू केले आहे. संपर्कातून सर्वाधित बाधा होत असल्याचे वारंवार सिध्द होत आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवसात जिल्ह्यात तब्बल ४४८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. सोमवारी पुन्हा नव्या २०३ रुग्णांची भर पडली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणाच आता तणावात आली आहे. हा संसर्ग असाच वाढत राहिला तर पुढे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.रविवारपर्यंत एकूण बाधितांची संख्या दोन हजार ३४४ वर पोहोचली होती. सोमवारच्या २०३ बाधितांमुळे आता एकूण रुग्णसंख्या २५४७ झाली आहे. यातील १२४९ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत तर १२६९ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे.यासोबतच जिल्ह्यात सोमवारी आणखी तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये, बाबुपेठ चंद्रपूर येथील ५५ वर्षीय पुरूष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला २२ ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने ३० ऑगस्टला त्याचा मृत्यू झाला आहे. ४५ वर्षीय ऊर्जानगर येथील पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला कोरोना व्यतिरिक्त श्वसनाचा आजार होता. तर तिसरा मृत्यु हा ६५ वर्षीय गांधी वार्ड बल्लारपूर येथील पुरुष बाधिताचा झाला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत २९ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील २६, तेलंगणा, बुलडाणा व गडचिरोली येथील प्रत्येकी एका बाधिताचा समावेश आहे. सोमवारी पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील १२२, राजुरा तालुक्यातील १३, वरोरा तालुक्यातील नऊ, बल्लारपूर तालुक्यातील नऊ, भद्रावती तालुक्यातील तीन, गोंडपिपरी तालुक्यातील २३, पोंभूर्णा तालुक्यातील एक, कोरपना तालुक्यातील पाच, सावली तालुक्यातील दोन, मूल तालुक्यातील १२, नागभीड तालुक्यातील चार बाधित असे एकूण २०३ बाधित पुढे आले आहे.जि.प. सभापतीही बाधितजि. प. मधील समाजकल्याण सभापतींनाही कोरोनाची लागण झाली आहे. सिंदेवाही येथील आंबेडकर चौक येथील रहिवासी असलेल्या परिसरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. त्यांच्यासह इतर दोन लोकांना लागण झाल्याची माहिती आहे.वयोवृद्धांची घ्यावी काळजी५० वर्षावरील नागरिकांची घरोघरी जाऊन मोठया प्रमाणात आरोग्य तपासणी सुरू आहे. नागरिकांनी घरी येणाऱ्या आरोग्य पथकाला सहकार्य करावे. नागरिकांनी बाहेर पडताना मास्कचा वापर करावा, दैनंदिन कामे करताना सोशल डिस्टन्सिंग ठेवावे. हॅन्ड सॅनिटायझरचा वापर करावा. तसेच ताप, सर्दी, खोकलासारखे लक्षणे आढळल्यास तत्काळ आरोग्य विभागाला माहिती देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे जेवढे मृत्यू झाले, त्यात ५० वर्षांवरील रुग्ण अधिक आहेत. त्यामुळे ५० वर्षावरील वयोवृध्दांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.चंद्रपुरातील नवे बाधित या परिसरातीलचंद्रपुरातील रेस्ट हाऊस परिसर, पटवारी भवन, बिनबा वार्ड, ऊर्जानगर, रामनगर कॉलनी परिसर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसर, पठाणपुरा वार्ड, जिल्हा कारागृह, दुर्गापूर सिद्धार्थ नगर वार्ड नं. ४, किरमे प्लॉट बाबुपेठ, चेतन गॅस एजन्सी जवळ रामनगर, आकाशवाणी रोड परिसर, साईबाबा वार्ड, दुगार्पुर वार्ड नं.१, देना बँक परिसर बाजार वार्ड, बालाजी वार्ड गोपालपुरी, महाराष्ट्र बँक परिसर तुकूम, हनुमान मंदिर परिसर दादमहल वार्ड, भानापेठ वार्ड विजय टॉकीज परिसर, दिनकर नगर लालगुडा, कन्नमवार वार्ड अंचलेश्वर गेट परिसर, विठ्ठल मंदिर वार्ड, बाजार वार्ड चौधरी पॅलेस परिसर, भिवापूर वार्ड ओम नगर, प्लॉट नं. १ सोईतकर हाऊस परिसर, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर, खत्री कॉलेज परिसर, जीवन साफल्य कॉलनी भागातून बाधित पुढे आले आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या