शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कोरपना तालुका बोगस डॉक्टरांच्या तावडीत

By admin | Updated: May 12, 2014 23:28 IST

तालुक्यात वाढत्या औद्योगिकरणामुळे प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. या प्रदूषणाचे दुष्परिणाम अलीकडे तालुकावासीयांना बरेच जाणवायला लागले.

कोरपना : तालुक्यात वाढत्या औद्योगिकरणामुळे प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. या प्रदूषणाचे दुष्परिणाम अलीकडे तालुकावासीयांना बरेच जाणवायला लागले. दम्यासारखे विकार अनेकांना जडले असून सद्यस्थितीत तालुक्यात असलेल्या वैद्यकीय सेवा कुचकामी ठरत आहेत.

५४ ग्रामपंचायती अन् ११३ गावे कोरपना तालुक्यात समाविष्ट आहेत. कोरपना व गडचांदूर येथे ग्रामीण रुग्णालय तर नारंडा, मांडवा आणि विरूर (गाडेगाव) येथे तीन प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या पाच ठिकाणाहून तालुकावासीयांना आरोग्य विषयक सेवा पुरविण्यात येतात. तालुका स्थळी असलेल्या ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका आणि औषधांची नेहमीच वानवा राहते. आरोग्य केंद्रातही डॉक्टर असले तर, आरोग्य सेविका उपस्थित नसतात. अशा वेळी नाईलाजाने येथील नागरिकांना खासगी रुग्णालयाची वाट धरावी लागते. माणिकगड पहाडाच्या पायथ्याशी असलेल्या अनेक खेडेगावात वैद्यकीय सेवा कोसोदूर आहेत. गंभीर आजार उद्भवल्यास रुग्णांना मृत्यूला कवटाळावे लागते. अशी गंभीर स्थिती असताना उपलब्ध शासकीय वैद्यकीय सेवाबाबत तक्रारी वाढतच आहेत.

ग्रामीण भागात शासनाने आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रे निर्माण केले. काही निवडक ठिकाणी त्याद्वारे गोरगरीब जनतेला चांगली सेवा मिळतही आहे. मात्र अनेक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राबाबत समस्या व तक्रारींचा पाढा वाढत आहे. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील बोगस प्रमाणपत्र मिळवून अथवा शहरातील प्रतिष्ठित डॉक्टरांच्या रुग्णालयात कंपाऊडर म्हणून काम करून ग्रामीण भागात बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय करण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एकदाही अशा डॉक्टरांच्या नोंदणी प्रमाणपत्रांची तपासणी झाली नाही. त्यामुळे आजघडीला नांदाफाटा, गडचांदूर, नारंडा, कोरपना, पिपर्डा, अंतरगाव, कढोली, सोनुर्ली, पारडी परिसरात पन्नासावर असे बोगस डॉक्टर कार्यरत असल्याची माहिती आहे.

ग्रामीण भागातील अशिक्षित जनता ‘देव म्हणजे डॉक्टर’ मानतात. परंतु काही डॉक्टर सध्या वैद्यकीय व्यवसाय सेवा म्हणून न करता तो ग्रामीण व शहरी भागात धंदा झाला आहे. त्यामुळे अधिक नफा मिळविण्याच्या नादाने काही डॉक्टर रुग्णांची लुबाडणूक करू लागले आहेत.

ग्रामीण भागातील १0 वी, १२ वी किंवा पदवीपर्यंत शिक्षण झालेल्या तरुणांना कंपाऊंडर म्हणून रुग्णालयात कामास ठेवायचे त्यानंतर ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय करायला लावायचा आणि आपल्या रुग्णालयात पाठवायला लावायचे अशी साखळी बर्‍याच रुग्णालयात सुरू आहे. यातूनच ग्रामीण भागातील दुर्गम भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला आहे. (तालुका प्रतिनिधी)