घोसरी : घराजवळील बाभळीचे झाड तोडत असताना अटकाव केल्याने उद्धभवलेल्या वादातून माजी सरपंचाच्या पतीने डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले. तर दुसऱ्या गटाने मारहाण करून हाताला इजा पोहचविल्याची घटना देवाडा (बुज) येथे बुधवारी घडली. दोघांच्याही तक्रारीवरून परस्परांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मूल पोलीस ठाणे अंतर्गत बेंबाळ चौकीच्या हद्दीतील देवाडा (बुज) येथील माजी सरपंच जोत्सना प्रदीप झाडे यांचे पती घराजवळील बाभळीचे झाड तोडत असताना शेजारील भगवान वाळके यांनी झाड आपले असल्याचे सांगत अटकाव केल्याने शाब्दीक वाद उद्भवला. अशातच राग अनावर झाल्याने प्रदीप झाडे यांनी कुऱ्हाडीने डोक्यावर वार करून भगवान वाळके यास गंभीर जखमी केले.पोलिसांनी प्रदीप झाडे, परशुराम भडके, सिद्धार्थ गेडाम, वाल्मीक अवथरे तसेच भगवान वाळके, चोखा वाळके, मंदा वाळके, हंसराज वाळके यांच्यावर गुन्ह्याची नोंद केली आहे. (वार्ताहर)
झाड तोडण्यावरून कुऱ्हाडीने वार
By admin | Updated: September 14, 2015 00:46 IST