शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला

By admin | Updated: January 30, 2017 03:00 IST

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असला तरी पाहिजे तशी रणधुमाळी

आज फुटणार फुगा : रात्री उशिरा होणार यादी जाहीर चंद्रपूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असला तरी पाहिजे तशी रणधुमाळी अद्यापही सुरू झालेली नाही. १६ फेब्रुवारीला मतदान आहे. मात्र आज २९ जानेवारीपर्यंतही उमेदवारांची यादी शेतकरी संघटना वगळता कोणत्याही राजकीय पक्षाने अद्याप जाहीर केलेली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. दरम्यान, ३० जानेवारीला रात्री उशिरापर्यंत सर्वच राजकीय पक्ष यादीचा फुगा फोडणार असल्याची माहिती आहे. १६ फेब्रुवारीला जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. याला केवळ १८ दिवस उरले आहेत. मात्र राजकीय पक्षांनी उमेदवारांची यादीच जाहीर न केल्याने इच्छुकांमध्ये चांगलीच अस्वस्थता पसरल्याचे दिसून येत आहे. २५ जानेवारीपर्यंत जवळजवळ सर्वच पक्षाची यादी जाहीर होईल, असा अंदाज राजकीय पुढाऱ्यांकडूनच वर्तविण्यात आला होता. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे २५ जानेवारीपासून एक-एक दिवस पुढे रेटणे इच्छुकांना मोठे कठीण जात आहे. अजूनही यादी जाहीर झाली नाही, त्यामुळे प्रत्यक्ष प्रचारासाठी उमेदवारांना केवळ १६ दिवसच मिळणार आहे. पक्षाची तिकीट मिळाली नाही तर बंडखोरीची शक्यता असते. त्यामुळे अशा बंडखोरांना मोर्चेबांधणीसाठी वेळ मिळू नये, यासाठी सर्वच राजकीय पक्ष विलंबानेच उमेदवारांची यादी जाहीर करीत असावे, असाही अंदाज वर्तविला जात आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (कवाडे गट), आरपीआय (गवई गट), सपा यांच्याशी आघाडी करूनच निवडणूक रिंगणात उतरणार आहेत, अशीही माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने १२ जागांची मागणी केल्याची माहिती आहे. यासोबत आघाडीत येणाऱ्या इतर पक्षांना किती जागा द्यायच्या, याबाबत विचारविनिमय सुरू असल्याने काँग्रेसची यादी जाहीर होण्यास विलंब लागत आहे. यासोबतच काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपविण्यासाठीही मुंबई स्तरावर बराच प्रयत्न करण्यात आला. हा प्रयत्न यशस्वी झाल्याचे दिसून येत असले तरी यात बराच वेळ गेल्याने यादी व युतीबाबत विलंबाने चर्चा झाली. काँग्रेसचे विधानसभेचे उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार हे स्वत: यादी व युतीबाबत चर्चा करण्यासाठी मुंबईला मुक्कामी होते. ते आज रविवारी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. मुंबईवरून येतानाच ते एबी फार्म घेऊन आल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दुसरीकडे भाजप गोटातही उत्सुकता शिगेला गेली आहे. इच्छुक उमेदवार बाशिंग बांधून सज्ज असले तरी पक्षाकडून अधिकृत इशारा मिळत नसल्याने त्यांचीही अस्वस्थता वाढली आहे. दरम्यान, भाजपाचीही उमेदवारांची यादी ३० ला जाहीर होणार, अशी माहिती आहे. शिवसेनेने स्वबळावर लढण्याची आपली भूमिका आधीच जाहीर केली असली तरी कोणत्या उमेदवाराला कोणत्या गट व गणात उतरवावे, यावर शिवसेनेचे वरिष्ठ नेते विचार करीत आहे. त्यांचीही यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. (शहर प्रतिनिधी) काँग्रेसचे एबी फार्म आलेत ? ४आ. विजय वडेट्टीवार मुंबईहून जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबतच काँग्रेस पक्षाचे एबी फार्मही जिल्ह्यात आल्याची माहिती आहे. याबाबत आ. विजय वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधला असता ते याबाबत फारसे बोलले नाहीत. मात्र युती व यादीबाबत ६५ टक्के काम झाले आहे. युतीतील सर्वच पक्षाचे समाधान करून लवकरच यादी जाहीर करू, असे त्यांनी सांगितले. भाजपाची अंतिम बैठक ४जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर भाजपाची अंतिम बैठक आज रविवारी रात्री होणार आहे. या बैठकीतच पक्षाची यादी समोर येणार आहे. मात्र ती अधिकृतरित्या सोमवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. या संदर्भात भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पक्षाची यादी सोमवारी जाहीर होण्यास दुजोरा दिला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा तयारीनिशी सज्ज आहे. उमेदवारी अर्ज सादर करणे २७ जानेवारीपासूनच सुरू झाले आहे. मात्र यावेळी राजकीय पक्षाकडून निवडणूक लढायची असेल तर आधीच पक्षाचा एबी फार्म जोडणे बंधनकारक आहे. त्यामुळे इच्छुकामधून कुणीही फार्म भरलेला नाही. मात्र ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव-मुडझा जि.प. गटासाठी विनोद रामदास झोडगे यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज आज सादर केला आहे. सध्या हा एकमेवच अर्ज सादर करण्यात आला आहे. पंचायत समिती गणासाठी अद्याप एकही अर्ज आलेला नाही.