शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

वरोऱ्यात कडकडीत बंद पाळून कोरेगाव भीमा घटनेचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 00:44 IST

कोरेगाव भीमा येथे आंबेडकरी अनुयायांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा वरोरा शहरात निषेध करण्यात आला. शुक्रवारी वरोरा शहरातील शाळा, महाविद्यालये, व्यवसायिक प्रतिष्ठाने बंद होती. कडकडीत बंद पाळून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

ठळक मुद्देपडसाद कायम : जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्रशासनाला दिले जात आहे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : कोरेगाव भीमा येथे आंबेडकरी अनुयायांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा वरोरा शहरात निषेध करण्यात आला. शुक्रवारी वरोरा शहरातील शाळा, महाविद्यालये, व्यवसायिक प्रतिष्ठाने बंद होती. कडकडीत बंद पाळून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.१ जानेवारीला कोरेगाव भीमा येथे २०० व्या शौर्य दिनानिमित्त शौर्य स्तंभास मानवंदना देण्यास लाखोच्या संख्येने समुदाय उपस्थित झाला होता. या जनसमुदायावर अचानक हल्ला चढविण्यात आला. यासोबत उपस्थितांच्या वाहनांची तोडफोड केली. या घटनेचा निषेध करण्यासाठी वरोºयात शुक्रवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळीच शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आले तर व्यवसायिकांनीही आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून सहकार्य केले. दुपारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे तहसील कार्यालयाच्या आवारात सभेमध्ये रूपांतर झाले. यावेळी अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. भ्याड हल्ल्याच्या मुख्य सुत्रधारास अटक करावी, घटनेचा तपास सीआयडीकडे देण्यात यावा आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार सचिन गोसावी यांना देण्यात आले. यावेळी केशव ठमके, सुनील वरखडे, डॉ. हेमंत खापणे, काँग्रेस नेते डॉ. विजय देवतळे, माजी नगराध्यक्ष विलास टिपले, बंडु लभाने, युवा सेना उपजिल्हा प्रमुख मनीष सेठानी, युवा सेना शहर प्रमुख कासीफ खान, वि.तु. बुरचुंडे, अ‍ॅड. रोशन नकवे, साजीद पठाण, शुभम चिमूरकर, खुशाल मेश्राम, यशवंत सायरे, अमोल डुकरे, राहुल कळसकर, सुनील गायकवाड, रवी डोंगरकर, कुंभारे, नगरसेवक छोटु शेख, जि.प. सदस्य सुनंदा जीवतोडे, आसीफ रजा, मनोज तेलंग, रूपेश टिपले आदी उपस्थित होते.दरम्यान, या घटनेचे पडसाद अजूनही जिल्ह्यातील अनेक भागात दिसून येत आहेत. आंबेडकरी अनुयायांकडून प्रशासनाला निवेदन देण्यात येत आहे.मूल येथे निषेध मोर्चा, उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनमूल : कोरेगाव भीमा येथील बौद्ध बांधवावर काही समाजकंटकानी दगडफेक करून भ्याड हल्ला केला. त्याच्या निषेधार्थ मूल येथे तिसऱ्या दिवशीही पडसाद उमटले. मूल तालुक्यातून आलेल्या विविध गावातील बौद्ध बांधवांनी मूलमध्ये निषेध मोर्चा काढला. विविध घोषणा देत ताडाळा रोड स्थित डॉ. आंबेडकर पुतळ्यापासून ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा नेण्यात आला. त्यानंतर उपविभागीय अधिकारी खेळकर यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यात कोरेगाव भीमा येथील घटनेची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी, मृतकाला २० लाखांची मदत द्यावी, दगडफेक करणाºया समाजकंटकांना अटक करून मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्व बौद्ध समाज संघटनेचे शम्मीकांत डोर्लीकर, काजु खोब्रागडे, श्याम उराडे, अतुल गोवर्धन, कुयार दुधे, विनोद निमगडे, सिद्धार्थ रामटेके, बाळू दुधे, पुरुषोत्तम साखरे, उमाजी खोब्रागडे, दिलीप रामटेके, गौतम पेरके, ताराचंद सुजीत खोब्रागडे आदींनी केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजू झाडे यांनी मोर्चाला मार्गदर्शन केले. तालुक्यातून ताडाळा, चिचाळा, चांदापूर, वाघराण, बेंबाळ, राजगड, बोरचांदली, चिमढा, टेकाडी, राजोली, मारोडा, केळझर, जानाळा, विरई आदी गावांतील साडेतीन हजारांवर बौद्धबांधव उपस्थित होते.