चंद्रपूर : धनोजे कुणबी महिला आघाडी चंद्रपूरच्या वतीने धनोजे कुणबी समाज मंदिरात बुधवारी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमात रांगोळी स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा (स्वच्छ भारत अभियान), प्रश्नमंजुषा, भजनस्पर्धा, एक मिनीट स्पर्धा तसेच नृत्य स्पर्धा (एकल व समूह) अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या.समारोपीय तसेच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्षा डॉ. प्रभा वासाडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. याप्रसंगी कुंदा चवले, विमल भुसारी, मीना वासाडे, लता मत्ते उपस्थित होत्या. विजेत्या महिलांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. संचालन तनुजा बोढाले यांनी तर आभार अर्चना जीवतोडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यास शुभांगी रासेकर, सविता ऊरकुडे, शोभा देऊळकर, अॅड. संध्या मुसळे, अॅड. अनुपमा जेऊरकर, रजनी कुरेकार, संध्या गोहोकार, कल्पना कष्टी, मालती डाहुले, किरण दिवसे, किरण बल्की, अल्का ठाकरे, मंजुषा मोरे, ज्योत्स्ना मोहितकर, अल्का खापने, नीता पावडे, वनिता रोडे, कल्पना हिंगाणे, सुमित्रा बोढे, मंदा मुसळे यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
कुणबी महिला आघाडीतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम
By admin | Updated: March 22, 2015 00:00 IST