शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सीटीपीएस-खैरगाव शिवारात आली मगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 23:02 IST

सीटीपीएस खैरगाव शिवारात पुराच्या पाण्यात मगर आली. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून मगरीला रेस्क्यू करून वनविभाग व इको-प्रो टीमने सुरक्षित स्थळी सोडले.

ठळक मुद्देरेस्क्यू आॅपरेशन करून जाळ्यात पकडले

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सीटीपीएस खैरगाव शिवारात पुराच्या पाण्यात मगर आली. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून मगरीला रेस्क्यू करून वनविभाग व इको-प्रो टीमने सुरक्षित स्थळी सोडले.मागील आठवडाभरापासून संततधार पावसामुळे नद्या दुथळी भरून वाहत आहेत. अशातच इरई धरण भरले असल्याने धरणाचे सातही दरवाजे खोलण्यात आले आहे. त्यामुळे धरण लगतच्या गावाच्या शेतशिवारात पाणी भरले आहे. या पाण्यासोबत एक पाच फुट लांब मगर सीटीपीएसला लागून असलेल्या आणि नदी काठावर असलेल्या खैरगावच्या शेतशिवारात आली. पाणी ओसरल्यानंतर शेतात आलेली मगर गावकऱ्यांना दिसली. त्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी झाली. नागरिकांनी यांची माहिती वनविभाग व इको-प्रोला दिली. चंद्रपूर वनविभागची टीम व इको-प्रो सदस्य घटनास्थळी दाखल झाले. वनविभागचे मिलिंद किटे, बेग आणि इको-प्रोचे सूमित कोहले यांनी रेस्क्यूचे काम सुरु केले. मगरीला जाळ्यात घेण्यात यश आले. नागरिकांच्या प्रचंड गर्दी आणि आरडाओरडमुळे रेस्क्यू आॅपरेशनमधे अडचणी निर्माण होत होत्या. मगर जाळीतून सुटण्याचा प्रयत्न करीत होती. इको-प्रो वन्यजीव संरक्षक दलसह संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे पोहचले. यानंतर नागरिकांना शांत करीत सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. जाळीत आलेल्या मगरीचे आधी तोंड बांधून व्यवस्थितरित्या रेस्क्यू करण्यात आले.मगरीला धरणात सोडलेयानंतर रेस्क्यू चमूने वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी जी. गुरुप्रसाद, विभागीय वनअधिकारी अशोक सोनकुसरे यांच्याशी चर्चा करून त्यांचे मार्गदर्शनामधे सदर मगरीला बफर अंतर्गत येणाºया मोहर्ली वनक्षेत्रातील इरई धरणात सोडण्यात आले. यावेळी मानद वन्यजीव रक्षक बंडू धोतरे, आगरझरी क्षेत्राचे वनपाल भूषण गजपुरे, रेस्क्यू चमूचे ए.आर. बेग, एम. कीटे, नंदू पडवे, धीरज दहेगावकर, वनमजूर के. जी .डांगे, एस. जी. रायपुरे, अंकित पडगीलवार, इको-प्रोचे आशिष मस्के, अमोल उत्तलवार, हरीश मेश्राम, सागर कावले, सचिन धोतरे आदी उपस्थित होते.