शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 06:00 IST

दोन दिवसांपूर्वीपर्यंत विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होती. अधिकारी, कर्मचारी वर्ग निवडणुकीच्या कामात व्यस्त होता. राजकीय कार्यकर्ते, पुढारी हेदेखील निवडणुकीतच व्यस्त होते. २४ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. २५ ऑक्टोबरपासून दिवाळी उत्सवच प्रारंभ झाला. त्यामुळे अनेकांची दिवाळीची खरेदी शिल्लक होती.

ठळक मुद्देदोनच दिवसात कोट्यवधींची उलाढाल । रस्त्यावर, बाजारपेठेत वाहनेच वाहने

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील दोन दिवसांपासून चंद्रपुरातील बाजारपेठेत प्रचंड गर्दी उसळली आहे. शहरातील महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी हे प्रमुख मार्ग गजबजून गेले आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी चंद्रपूरकरांची लगबग सुरू झाली आहे. रस्त्यावर, बाजारपेठेत वाहनेच वाहने दिसत असून मागील दोन दिवसात दिवाळीच्या खरेदीत कोट्यवधींची उलाढाल झाली आहे.दोन दिवसांपूर्वीपर्यंत विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होती. अधिकारी, कर्मचारी वर्ग निवडणुकीच्या कामात व्यस्त होता. राजकीय कार्यकर्ते, पुढारी हेदेखील निवडणुकीतच व्यस्त होते. २४ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. २५ ऑक्टोबरपासून दिवाळी उत्सवच प्रारंभ झाला. त्यामुळे अनेकांची दिवाळीची खरेदी शिल्लक होती. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून चंद्रपुरातील बाजारपेठा नागरिकांनी फुलून गेल्या आहे. गांधी चौक, गिरनार चौक, गोलबाजारातच पायदळ चालायलाही कसरत करावी लागत आहे.वाहतूक कोंडीमुळे खरेदीदार वैतागलेचंद्रपूर शहर मोठे असले तरी येथील मुख्य बाजारपेठ महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी मार्गालगतच आहे. त्यामुळे महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी मार्ग हे मुख्य रस्ते समजले जातात. या मार्गावरून वाहने जातात आणि परतही येतात. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. आता दिवाळीनिमित्त या मार्गावर प्रचंड गर्दी उसळली आहे. सायंकाळच्या सुमारास तर ही वर्दळ आणखी वाढते. वाहनांचे आवागमन या मार्गावरून वाढले असले तरी त्या तुलनेत पार्किंग झोन उपलब्ध नाहीत. त्यामुळे खरेदीसाठी बाजारपेठेत आलेले नागरिक वाट्टेल तिथे वाहने पार्क करीत आहे. यामुळे बाजारपेठेत मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत असून खरेदीदारच यामुळे वैतागले आहेत. वाहनांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे किमान जिथे वाहनांचा सर्वाधिक संपर्क येतो, त्या महात्मा गांधी व कस्तुरबा मार्गांना रुंद करणे गरजेचे आहे. येथील जटपुरा गेट वाहतूक कोंडीचे मुख्य कारण ठरत आहे. रस्त्यावरील वाहने वाढली की जटपुरा गेटवर वाहतुकीची कोंडी झालीच समजा. गोलबाजारात तर वाहन घेऊन जाणे अशक्य झाले आहे.

टॅग्स :Diwaliदिवाळी