शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

पीक विमाचे जमा केले 296 कोटी शेतकऱ्यांना वाटणार फक्त 26 कोटी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 05:00 IST

विमा काढणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रीमियम म्हणून ७ कोटी ३६ लाख ७ हजार ६३० रुपयांची रक्कम विमा कंपन्यांकडे जमा केली. याशिवाय जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी  राज्य व केंद्र सरकारने प्रत्येकी १४ कोटी १२ लाख ८४ हजार ५६४ प्रमाणे २८ कोटी २५ लाख ६९ हजार १२८ आणि ग्रास प्रीमियम मिळून एकूण खरीप हंगामातील विम्याची रक्कम २९६ कोटी ५३ लाख ४२ हजार १९३ रुपये  विमा कंपन्यांकडे जमा केली आहे.

ठळक मुद्देप्रधानमंत्री पीक विम्याचे वास्तव : शेतकऱ्यांना अल्प मोबदला, विमा कंपन्या मालामाल

राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत जिल्ह्यात  खरीप २०२०-२१ मध्ये तब्बल २९६ कोटी ५३ लाख ४२ हजार १९३ हजारांची  रकम विमा (प्रीमियम) कंपन्यांकडे जमा करण्यात आली होती. परंतु, पीक नुकसानीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना फक्त २६ कोटी २५ लाख ८३ हजार ९२२ हजारांचीच रकम वाटण्यात येणार आहे. प्रत्यक्षात जमा आणि मोबदल्याच्या रकमेतील तफावत लक्षात घेतल्यास पीक विम्याच्या नावावर विमा कंपन्याच मालामाल होत आहेत. जिल्ह्यात भात लागवडीचे क्षेत्र सर्वाधिक आहे. पण, दरवर्षी खरीप हंगामात कापूस, सोयाबीन व अन्य कडधान्य लागवडीचे क्षेत्र वाढताना दिसते.  शेतीवरचे संकट कायम असल्याने आर्थिक कोेंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेला पसंती                    दिली. गतवर्षी खरिपात तब्बल ९७ हजार ३४७ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. कर्जदार शेतकऱ्यांचा विमा हप्ता बँकेतूनच कापण्यात आला. पीक विमा अंतर्गत येणारे खरीप लागवडीचे क्षेत्र ६८ हजार ९५९ हेक्टरपर्यंत विस्तारले. विमा काढणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रीमियम म्हणून ७ कोटी ३६ लाख ७ हजार ६३० रुपयांची रक्कम विमा कंपन्यांकडे जमा केली. याशिवाय जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी  राज्य व केंद्र सरकारने प्रत्येकी १४ कोटी १२ लाख ८४ हजार ५६४ प्रमाणे २८ कोटी २५ लाख ६९ हजार १२८ आणि ग्रास प्रीमियम मिळून एकूण खरीप हंगामातील विम्याची रक्कम २९६ कोटी ५३ लाख ४२ हजार १९३ रुपये  विमा कंपन्यांकडे जमा केली आहे.  

५१ हजार १५० शेतकरी पीक विम्यातून बाद आतापर्यंत १० हजार ३२७ शेतकऱ्यांना ३ कोटी ४० लाख ५३ हजार ३१२ रुपयांचा विमा मोबदला वाटप करण्यात आला. जिल्ह्यातून ९७ हजार ३४७ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. त्यापैकी ४६ हजार १९७ लाभास पात्र ठरले, तर ५१ हजार १५० शेतकरी विम्यातून बाद झाले आहेत. 

केंद्र सरकारने बदलावी नियमावलीविमा कंपन्या शेतकऱ्यांकडून मोठी रकम जमा करतात. मात्र, पुरेसा मोबदला देत नाही. याबाबत राज्य सरकारने केंद्राकडे सुधारणा करण्याची मागणी केली. मात्र, अद्याप दखल घेण्यात आली नाही. केंद्राने नियमावली बदलविली तरच विमा कंपन्यांची नफेखोरी संपू शकेल, असे जाणकारांचे मत आहे.

विमा कंपनी व कृषी विभागावर शेतकऱ्यांचा रोष विम्यासाठी पात्र ठरलेले शेतकरी व मंजूर भरपाईच्या रकमेची माहिती संबंधित विमा कंपन्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला सादर केली. त्यानुसार, पीक विमा हक्काची २६ कोटी २५ लाख ८३ हजार ९२२ रुपयांची रकम ४६ हजार १९७ शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. उत्पन्नावर हक्क रक्कम अंतर्गत ४५ हजार ९९३ शेतकरी पात्र ठरले. विमा काढणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. मात्र, निकषात पात्र ठरलेल्यांनाच लाभ मिळते, असे सांगितले जाते. त्यामुळे विमा कंपनी व कृषी विभागावर शेतकरी रोष व्यक्त करतात.

२५५ शेतकऱ्यांनाच स्थानिक आपत्तींतर्गत लाभ  स्थानिक आपत्तींतर्गत पिकांचे नुकसान झालेल्या २५५ शेतकऱ्यांनाच विम्याचा लाभ मिळणार आहे. मीड टर्म नुकसान श्रेणीत १४ हजार ७० शेतकरी आणि काढणीनंतर नुकसान झालेल्या श्रेणीत ११७ शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरले आहेत.   

 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाagricultureशेती