लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वरोरा तालुक्यातील आकोला नं. १ येथील शारदा अरूण उमरे यांच्या बोडीमध्ये रविवारी दोन मगरीची पिल्ले आढळून आली होती. ती मगरीची पिल्ले पिपल अॅडमायर सोसायटीच्या सदस्यांनी वनविभागाच्या मदतीने पकडून त्यांना त्या पिल्लांना चारगाव धरणात सोडण्यात आले.सध्या रब्बी हंगाम सुरू आहे. यावर्षी रब्बी हंगामात पाऊस न आल्याने मागील काही दिवसांपासून बोडीचे पाणी इंजिनच्या सहाय्याने जमिनीला देणे सुरू आहे. रविवारी बोडीतील पाणी संपण्याच्या मार्गावर असताना गजानन उमरे व शामदेव उमरे यांना मगरीचे दोन पिल्ले आढळून आले. याची माहिती गजानन उमरे यांनी आॅल पिपल अॅडमायर सोसायटी तसेच वनविभागाला दिली. दरम्यान वनविभागाचे आर. एच. नागदेवते, मंगेश गेडाम, रविद्र उरकुडकर, रमेश नागकेशे यांच्यासह टिमचे हर्षद घोडीले, व्यंकटेश खटी, प्रशांत खनोजे, संदीप सोनेकर, विशाल मोरे, प्रणव मोटके, प्रशांत राऊत संपूर्ण साहित्यासमवेत शेतात दाखल झाली. यावेळी उपस्थिती होती. यावेळी रेस्क्यू टिमने बोडीच्या पाण्याचा अंदाज घेत मगरीची पिल्ले पकडली. वनविभागाच्या अधिकारी मगरीच्या दोन्ही पिल्ल्यांचा पंचनामा करून दप्तरी नोंद केली. ही पिल्ले दीड फूट लांबीची असून वजन साधारणपणे दोन किलो आहे. या पिल्लामध्ये एक नर आणि एक मादी आहे. मगरीच्या पिल्लांला पाहण्यांसाठी मोठी गर्दी उसळली होती.
रेस्क्यूआॅपरेशन करून पकडली मगरीची पिल्ले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 22:43 IST
वरोरा तालुक्यातील आकोला नं. १ येथील शारदा अरूण उमरे यांच्या बोडीमध्ये रविवारी दोन मगरीची पिल्ले आढळून आली होती. ती मगरीची पिल्ले पिपल अॅडमायर सोसायटीच्या सदस्यांनी वनविभागाच्या मदतीने पकडून त्यांना त्या पिल्लांना चारगाव धरणात सोडण्यात आले.
रेस्क्यूआॅपरेशन करून पकडली मगरीची पिल्ले
ठळक मुद्देपीपल अॅडमायर संस्थेचा पुढाकार : वनविभागाने केली नोंद