शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

धान उत्पादक शेतकºयांवर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:49 IST

तळोधी (बा) अप्पर तालुक्यातील धान उत्पादक शेतकºयांच्या धानपिकावर यावर्षी मोठ्या प्रमाणात मावा, तुडतुडा, बेरड, करपा, लाल्या, गाद व अनेक रोगांचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे ....

ठळक मुद्देधान उत्पादनात घट : ब्रह्मपुरी तालुक्याचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कतळोधी (बा) : तळोधी (बा) अप्पर तालुक्यातील धान उत्पादक शेतकºयांच्या धानपिकावर यावर्षी मोठ्या प्रमाणात मावा, तुडतुडा, बेरड, करपा, लाल्या, गाद व अनेक रोगांचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे ह्या परिसरातील शेतकºयामध्ये कृषी विभागाने धान पिकांचे सर्वेक्षण करून रोगांना विषयी माहिती उपलब्ध करून न दिल्यामुळे व त्यांच्यामध्ये प्रशासना विरोधात असंतोष उफाळला असून नुकसानग्रस्त शेतकºयांच्या धानपिकांचे सर्वेक्षण करून नुकसान मागणी जोर धरत आहे.तळोधी (बा) हे पूर्व विदर्भातील धान पिकासाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती असून या ठिकाणी चिमूर, नागभीड, सिंदेवाही, मेंडकी व परिसरातील अनेक गावातून धान्य विक्रीसाठी आयात केले जाते. मात्र ह्यावर्षी या परिसरात मोठ्या प्रमाणात धान पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाल्याचे दिसून येत आहे. या परिसरातील शेतकºयांनी विविध मार्गाने धान रोवणीसाठी कर्ज घेवून रोहणी केलेले होते. मात्र ऐनवेळी हातात येणारे धान पिकावर महागड्या औषधीची फवारणी करून सुद्धा त्यांचा काहीच परिणाम होत नसून पुर्णपणे धानपिक नष्ट होत आहे. मात्र शासन शेतकºयांना दिलासा म्हणून कर्जमाफी देवू असा प्रकारचे खोटे आश्वासन देत असून अजूनपर्यंत शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीचा एक रुपया सुद्धा जमा झालेला नाही. अशा प्रकारे दुहेरी संकटात शेतकरी आहे.रामपूर : सास्ती, धोपटाळा, कोलगाव, मानोली या भागात वेकोलीच्या कोळसा खाणी आहे. मात्र वेकोली बल्लारपूर क्षेत्रामार्फत पर्यावरणाचा कुठलाही विचार केला जात असून असंख्य प्रमाणात बांभुळीचे झाडे या भागात पसरले असून जंगली डुकरांचे वास्तव्य वाढले रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात डुकरांचा कळप शेतीत घुसून शेतीला पिकांचे अतोनात नुकसान करीत असून सदर भागातील हजारो शेतकरी आर्थिक संकटात येत आहे. या अगोदर वारंवार तक्रारी देऊन सुद्धा कृषी विभाग, वन विभाग यांनी केवळ पंचनामा करुन अडीचशे ती तीनशे रुपये हेक्टरीच नुकसान भेटले. असे सांगण्यात येत असून वेकोली प्रशासन निगरगट्ट झाले आहे. ते सुद्धा ऐकून घेत नाही आहे. अर्ध्याअधिक शेती ही वेकोलीच्या प्रदूषणाच्या विखाड्यात भेटली असून अर्ध्या शेतीच्या उत्पादनावर डुकरांनी हात साफ केला आहे. येथील शेतकºयांवर उपासमारीची वेळ येत आहे. १ मे रोजी सास्ती ग्रामपंचायतीत सहा टक्के नुसार ठराव घेऊन शेतकºयांचा विचार करीत नसेल तर कोळसा खाणी बंद करण्याचा ठरव घेण्यात आला होता. त्याचबरोबर कोलगाव ग्रामपंचायतीने आठ एक नुसार ठराव घेऊन खाण बंद करण्यात ग्रामसभेचा ठराव घेतला होता. मात्र त्या ठरावाची अंमलबजावणी करण्यास शासनाने नकार दिला आहे. करिता सदर भागातील शेतकºयांवर उपासमारीची वेळ आहे.मी तीन एकरात धान लावला. यावर माझे पन्नास हजार रुपये खर्च झाले. आता धानाची फसल अंतिम टप्प्यात आलेली असताना या धानावर विविध रोगांनी आक्रमण केलेले आहे. यामुळे माझे संपुर्ण फसल नष्ट झालेली आहे. आता मी धानपिकासाठी घेतलेले कर्ज कसे फेडू याची चिंता लागली आहे.- संजय तलमले,शेतकरी, तळोधी (बा)