लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : चंद्रपूर जिल्ह्यातील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर पादचाऱ्यांसाठी स्कायवॉकची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
स्कायवॉकची निर्मिती झाल्यास पादचार्यांना वर्दळीचा रस्ता ओलांडणे सुरक्षित होईल. तसेच यामुळे होणाऱ्या अपघातांच्या घटनांना आळा बसेल. जिल्ह्यात नागपूर - चंद्रपूर मार्गावरील वरोरा येथील आनंदवन चौक, रत्नमाला चौक, नंदोरी, भद्रावती टप्पा, बसस्थानक परिसर , घोडपेठ, ऊर्जाग्राम, मोरवा, पडोली, चंद्रपूर येथील कुंदन प्लाझा चौक, गजानन महाराज चौक, जनता कॉलेज चौक, प्रियदर्शनी चौक , बसस्थानक परिसर, वीर सावरकर चौक, चंद्रपूर- नागभिड मार्गावरील नागभीड येथील ब्रह्मपुरी जोडरस्ता, तळोधी बाळापूर, सिंदेवाही शिवाजी चौक, राजोली, मूल - सोमनाथ जोड रस्ता, अजयपूर, चिचपल्ली, मूल - चामोर्शि मार्गावरील खेडी फाटा, चंद्रपूर - आलापल्ली मार्गावरील बंगाली कॅम्प, बायपास जोडरस्ता, विसापूर, बॉटनिकल गार्डन गेट, बल्लारपूर येथील कला मंदिर चौक, पेपर मिल गेट, बसस्थानक परिसर, नगर परिषद परिसर, रेल्वे स्टेशन चौक, बामणी टी पॉईंट, येनबोडी, कोठारी, करंजी, गोंडपिपरी येथील जुना बसस्टॉप परिसर, मुल जोडरस्ता, विठ्ठलवाडा राजुरा - आसिफाबाद मार्गावरील बसस्थानक परिसर, पंचायत समिती चौक, देवाडा, लक्कडकोट, राजुरा आदिलाबाद मार्गावरील राजुरा येथील नाका नंबर तीन, सास्ती टी पॉईंट, अंबुजा टी पॉईंट, गडचांदूर येथील माणिकगड सिमेंट गेट मार्ग चौक, बसस्थानक परिसर, सावित्रीबाई फुले विद्यालय चौक, लालगुडा, वनसडी, कोरपना बसस्थानक परिसर, पारडी, कोरपना - वणी मार्गावरील तांबडी फाटा, हेटी, वरोरा - चिमूर मार्गावरील भटाळा, शेगाव बुद्रुक, मेसा, खडसंगी, चिमूर येथील बालाजी मंदिर परिसर, भिसी जोडरस्ता, चिमूर - ब्रह्मपुरी मार्गावरील जांभूळघाट, कानापा टेम्पा, किरीमिटी मेंढा, ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद चौक, ब्रह्मपुरी - वडसा मार्गावरील बसस्थानक चौक, ब्रह्मपुरी-आरमोरी मार्गावरील मुख्य मार्केट जोडरस्ता, रेल्वे स्थानक जोडमार्ग , चिमुर - गडचिरोली मार्गावरील नवरगाव, पाथरी , मुल - गडचिरोली मार्गावरील सावली, वरोरा- वणी मार्गावरील साई मंगल कार्यालय चौक, कुचना, पाटाळा आदी स्थळांवरील वर्दळीच्या मार्गावर पादचाऱ्यांच्या सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीकोनातून स्कायवॉकची निर्मिती होणे गरजेची आहे. याचा फायदा वयोवृद्ध, महिला, लहान मुले यांना रस्ता ओलांडताना होईल.