शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शहर व गावाच्या स्वच्छतेसाठी युवकांचे गट तयार करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 22:29 IST

शहर व गावात खऱ्या अर्थाने स्वच्छता निर्माण करायची असेल तर, प्रत्येकाने जागृत राहिले पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहकार्याने विविध शाश्वत उपक्रम राबविण्यासाठी युवक व युवतींनी गट निर्माण करून सक्रिय कार्यासाठी पुढे आले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. जयश्रीया क्लबमध्ये पार पडलेल्या कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

ठळक मुद्देजितेंद्र पापळकर : स्वच्छता सर्वेक्षण कार्यशाळा
<p>लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहर व गावात खऱ्या अर्थाने स्वच्छता निर्माण करायची असेल तर, प्रत्येकाने जागृत राहिले पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहकार्याने विविध शाश्वत उपक्रम राबविण्यासाठी युवक व युवतींनी गट निर्माण करून सक्रिय कार्यासाठी पुढे आले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. जयश्रीया क्लबमध्ये पार पडलेल्या कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.यावेळी जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) ओमप्रकाश यादव, उपक्रमाचे राज्य समन्वयक महेश कोडगीरे आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा शाश्वत स्वच्छता आराखडा निर्मिती व स्वच्छता सर्व्हेक्षण ग्रामीण या विषयातील विविध पैलुंविषयी विचारमंथन करण्यात आले. आराखड्याची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी चार पथक गठित करण्याचा निर्णयही योवळी घेण्यात आला़याशिवाय उपस्थितांच्या सुचनांना आराखड्यात स्थान देण्यात आले.कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी स्वच्छता सर्वेक्षण ग्रामीण २०१८ ही मोहीम जिल्ह्यातील प्रत्येक गावात यशस्वी करण्यासाठी पीपीटीद्वारे सादरीकरण झाले़ मुख्य कार्यकारी अधिकारी पापळकर म्हणाले, शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना प्रोत्साहन दिल्यास उपक्रमात सहजपणे सहभागी होतात़याकरिता विविध सामाजिक संस्था, महिला बचतगट व युवक मंडळ व लोकप्रतिनिधींनी नागरिकांना प्रोत्साहन द्यावे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले़ उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी सर्वेक्षणाच्या प्रत्येक टप्प्याची माहिती दिली़ जिल्हा स्वच्छता सर्वेक्षणात अधिकाधिक गुण कसे प्राप्त करता येईल, याविषयीही मार्गदर्शन केले.दीर्घकालिन धोरण निश्चित करणारजि़ प़ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वाघमारे म्हणाले, स्वच्छता सर्वेक्षण ग्रामीण ही मोहीम यशस्वी करायची असेल तर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांनी लोकसहभागाकडे लक्ष द्यावे़ जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षातील सर्व सल्लागारांनी या मोहिमेत सहभागी होऊन गावकऱ्यांचा उत्साह वाढविला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले़ या कार्यशाळेच्या माध्यमातून शहर व सर्व गावे शाश्वत स्वच्छ करण्याची दिशा मिळाली़ याविषयीचे धोरण निश्चित करण्याचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे़ दोन दिवशीय कार्यशाळेला जिल्ह्यातील ग्रामसेवक, सरपंच, विस्तार अधिकारी, बीआरसी,गटविकास अधिकारी, प्रकल्प अधिकारी, सहायक गट विकास अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.