शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कोविड केअर सेंटर्संना करावे लागणार अपडेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 05:00 IST

एसीएचसीमध्ये चंद्रपुरातील चार खासगी हॉस्पिटल्स व चंद्रपूर येथील क्राईस्ट चॅरिटेबल हॉस्पिटल तसेच ब्रह्मपुरीतील ख्रिस्तानंद हॉस्पिटलचा समावेश आहे. खासगी हॉस्पिटल्स स्वत:कडील उपलब्ध खाटांच्या क्षमतेनुसार रूग्णांना भरती करून घेऊ शकतात. मात्र, चंद्रपूर वन अकादमी, वरोरा, ब्रह्मपुरी, भद्रावती येथील कोविड केअर सेंटर व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील उपलब्ध सुविधांना लवकरच अपडेट करावे लागणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. 

ठळक मुद्देरूग्णवाढीचा वेग धडकी भरविणारा : आरोग्य सुविधांसह हवी मनुष्यबळ नियुक्तीचीही तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरटीपीसीआर सुमारे १ हजार २०० आणि अ‍ॅन्टिजेनच्या १ हजार ५०० चाचण्या केल्या जात आहे. जानेवारी-फेब्रुवारीच्या तुलनेत ही संख्या मोठी असली तरी चाचण्यांची संख्या पुन्हा वाढविण्याचा निर्णय  जिल्हा प्रशासनाने घेतला. त्यामुळे बाधितांची संख्या झपाट्याने वाढणार असून चारही कोविड केअर सेंटर्सला तातडीने अपडेट करावे लागणार      आहे.कोविड १९ चाचणी करण्यासाठी शासनाने चाचण्यांचे दोन प्रकार  मान्य केले. चाचणी केल्यानंतर बाधित आढल्यास त्यांच्या उपचाराकरिता डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल (डीसीएच), डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डीसीएचसी) आणि डेडीकेटेड कोविड केअर सेंटर (डीसीसीसी) अशी चार वर्गीकरणातील आरोग्य संस्थांची निर्मिती केली. एसीएचसीमध्ये चंद्रपुरातील चार खासगी हॉस्पिटल्स व चंद्रपूर येथील क्राईस्ट चॅरिटेबल हॉस्पिटल तसेच ब्रह्मपुरीतील ख्रिस्तानंद हॉस्पिटलचा समावेश आहे. खासगी हॉस्पिटल्स स्वत:कडील उपलब्ध खाटांच्या क्षमतेनुसार रूग्णांना भरती करून घेऊ शकतात. मात्र, चंद्रपूर वन अकादमी, वरोरा, ब्रह्मपुरी, भद्रावती येथील कोविड केअर सेंटर व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील उपलब्ध सुविधांना लवकरच अपडेट करावे लागणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. 

तर बेड्स अपुरे पडू शकतातनोव्हेंबर २०२० मध्ये रूग्ण संख्या घटल्याने कोविड केअर सेंटरमधील स्थायी कर्मचाऱ्यांना मूळ पदावर हलविण्यात आले. अस्थायी कर्मचाऱ्यांना कमी केले. सध्या या केंद्रात २२८ बाधित उपचार घेत आहेत. रूग्णवाढीची तीव्रता अशीच कायम राहिली तर येत्या काही दिवसातच उपलब्ध बेड्सही अपुरे पडू शकतात. याची उपाययोजना आधीच करणे गरजेचे आहे.

दहा रूग्णांवरून पोहोचले हजारावर!चार कोविड केअर सेंटरमध्ये ७५० बेड्स आहेत. नोव्हेंबर २०२० मध्ये अ‍ॅक्टीव्ह रूग्णांची संख्या दहावर होती. त्यामुळे कोरोना केअर सेंटरर्सच्या पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाले. जानेवारी ते मार्च २०२१ या तीन महिन्यातच रूग्णांची संख्या एक हजार ११ वर पोहोचली आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या