बल्लारपूर: येथील गुरुनानक विज्ञान महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त भौतिकशास्त्रवर ऑनलाईन पद्धतीने आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली.
यात मटेरियल आणि नॅनो टेक्नॉलॉजी या विषयावर परिसंवाद झाला. गुरुनानक महाविद्यालय आणि अमरावती येथील पी.आर.पोटे पाटील इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाचे मार्गदर्शक गुरुनानक महाविद्यालयाचे संस्थापक नगेन्द्र सिंग सोनी व पोटे महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रवीण पोटे होते.
प्राचार्य डॉ. बी.एम. बहिरवार आणि प्राचार्य डॉ. एम. व्ही. काळे यांच्या अध्यक्षतेत डॉ. अशोक जोशी यांनी मार्गदर्शन केले. डॉ. कॉन्स्टायनटीन(रशिया), प्रा. रामचंद्र पोडे (दक्षिण कोरिया), प्रा. एस. जे. ढोबळे (नागपूर), डॉ. मनीष शिंदे (पुणे), डॉ. सी. गायनेर (इस्रायल), डॉ. हरिनाथ (वारंगल), डॉ. आर. जी. तुंगातुरी (वूहान, चीन), डॉ. प्रीती गुप्ता (जर्मनी) या विषयतज्ज्ञांनी विस्तृतपणे मार्गदर्शन केले. या परिषदेचे विविध सत्र गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. ईश्वर मोहुर्ले, डॉ. सचिन वाझलवार (चंद्रपूर), डॉ. एन. आर. पवार (मारेगाव), डॉ. ए. यु. बाजपेयी (अमरावती) यांच्या अध्यक्षतेत पार पडले. परिषदेच्या आयोजक सचिव डॉ. शोभा गायकवाड व डॉ. अमोल भोयर, समन्वयक डॉ. नीलेश ठाकरे व डॉ. अमोल नांदे हे होते. डॉ. दिनेश देशमुख, अविनाश रट्टे, सपना शर्मा, नीलेश शेळके व सीमा भगत यांनी तांत्रिक नियोजनाची बाजू संभाळली.