या प्रात्यक्षिकासाठी भूमिपुत्र फार्मर प्रोडूसर कंपनी यांनी थ्रेडर उपलब्ध केले. सर्व शेतकऱ्यांना उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद मोरे यांनी मार्गदर्शन करून थ्रेडरचे कापूस पिकातील फायदे सांगितले. कापूस थ्रेडरमुळे पराटीचा भुगा होतो आणि कालांतराने ते जमिनीत कुजून सेंद्रिय कर्ब पुढील पिकासाठी वाढतो. तसेच पिकाचे उत्पन्न वाढते. त्याच बरोबर कापसाचे फरदड टाळण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले. कपाशी काढण्यासाठी तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी थ्रेडरचा वापर करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी विठ्ठल मकपल्ले यांनी केले. या प्रात्यक्षिकासाठी मंडळ कृषी अधिकारी चेतन चव्हाण, भूमिपुत्र फार्म प्रोड्युसर कंपनीचे सिईओ संप्रज्ञ वाघमारे, संदीप दातरकर, कृषी पर्यवेक्षक मंगेश गुरनुले, तालुक्यातील सर्व कृषी सहायक व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
वरुड रोड येथे कापूस थ्रेडर प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:20 IST