शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
4
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
5
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
6
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
7
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?
8
पाशांकुश एकादशीला 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; काय घ्यावी काळजी? वाचा!
9
उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..."
10
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
11
एआयपासून बनलेली जगातील पहिली अभिनेत्री, ओळखून दाखवणं कठीण; कलाकारांकडून तीव्र निषेध!
12
सकाळी रुग्णालयात... संध्याकाळी जिंकलं गोल्ड मेडल; रोझा कोझाकोव्स्काच्या जिद्दीला सॅल्यूट!
13
"मला त्याची गरज आहे...", घटस्फोटानंतर एकटीच करतेय मुलाचा सांभाळ; अभिनेत्री म्हणाली...
14
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
15
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
16
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
17
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
18
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
19
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
20
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल

बाजारपेठेअभावी कापूस परप्रांतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 22:48 IST

कापूस उत्पादकांचा जिल्हा अशी विदर्भ प्रांतात चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. कापूस हेच या भूमीतल्या शेतकºयांचे नगदी पीक आहे.

ठळक मुद्देजिल्ह्याला बाजारपेठ मिळेना : शेतकºयांना बसतो प्रवासाचा आर्थिक भुर्दंड

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : कापूस उत्पादकांचा जिल्हा अशी विदर्भ प्रांतात चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. कापूस हेच या भूमीतल्या शेतकºयांचे नगदी पीक आहे. मात्र शेतकºयांना गेल्या अनेक वर्षांपासून कापूस विकण्यासाठी हक्काची मोठी बाजारपेठ मिळालेली नाही. यामुळे बरेच शेतकरी परप्रांतात कापूस विक्रीसाठी नेतात. चंद्रपूर जिल्ह्यातील कापूस शेतकºयांना मोठी बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास ही समस्या सुटेल, अशी आशा शेतकरी बाळगून आहे.चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादन होत असते. जिल्ह्यातील राजुरा, कोरपना, जिवती, वरोरा, भद्रावती तालुक्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. या पिकाच्या उत्पादनावर शेतकºयांचा वर्षभराचा आर्थिक बजेट अवलंबून असते.विदर्भाच्या सुपिक मातीला पांढºया सोन्याचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. मात्र दरवर्षी शेतकºयांच्या कापसाला दिला जाणारा हमीभाव शेतकºयांचे कंबरडे मोडणारा आहे. शेतकºयांनी दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली. अनेक शेतकºयांचा कापूस निघायला सुरुवात झाली आहे. मात्र उत्पादन खर्च बघता शासनाने जाहीर केलेला हमीभाव अतिशय तोकडा आहे. यातून उत्पादनावर केलेला खर्चही भरुन निघणार नाही, एवढी बिकट परिस्थिती कापूस पिकांची आहे.दिवसंरात्र हाडाची काडी करुन काबाडकष्ट करणारा शेतकरी काळ्या मातीत पांढरे सोने पिकवतो. यामुळे कापसाला सोन्यासारखा भाव मिळणे अपेक्षीत आहे. मात्र आजपर्यंत शेतकºयांच्या पदरी कायम निराशाच आली आहे.शेतकरी तीन-चार दशकापासून कापूस पिकवत आहे. परंतु, शेतकºयांची होत असलेली परवड अजूनही थांबलेली नाही. कापूस उत्पादकांच्या चंद्रपूर जिल्ह्यात कापसाची मोठी बाजारपेठ व्हावी, ही गेल्या अनेक वर्षांपासूनची शेतकºयांची मागणी आहे. मात्र शेतकºयांची ही आर्त हाक शासन दरबारी पोहोचली नाही. हे येथील शेतकºयांचे दुदैव आहे.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापूस पिकवूनही बाजारपेठेअभावी तो नाईलाजाने परप्रांतात नेऊन विकावा लागतो. तेलंगणा राज्यातील आदिलाबाद व यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे कापसाची मोठी बाजारपेठ आहे.या तुलनेत चंद्रपूर जिल्हा कापसाच्या बाजारपेठेविना अजूनही पोरका आहे. जिल्ह्यात कापसाची मोठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने इतरत्र कापूस विकायला जाण्यासाठी लागणारा प्रवास खर्च शेतकºयांचे कंबरडे मोडणारा आहे. त्यामुळे येथे मोठ्या बाजारपेठेची मागणी आहे.मंत्र्यांकडून कापसाच्या बाजारपेठेची आशाचंद्रपूर जिल्ह्यात कापसाची मोठी बाजारपेठ व्हावी, ही गेल्या अनेक वर्षांपासूनची शेतकºयांची मागणी आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर व राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे जिल्ह्यातीलच आहेत. हे दोन बडेमंत्री सरकारमध्ये असल्याने शेतकºयांना या मंत्र्यांकडून जिल्ह्यात कापसाची मोठी बाजारपेठ व्हावी, अशी अपेक्षा आहे.चंद्रपूर जिल्ह्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु जिल्ह्यात कापसाची मोठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने नाईलाजाने कापूस परप्रांतात नेऊन विकावा लागत आहे. त्यावर होणारा आर्थिक खर्च शेतकºयांना परवडणारा नाही. त्यामुळे शासनाने योग्य पाऊल उचलून जिल्ह्यात बाजारपेठ स्थापन करणे गरजेचे आहे.- ज्ञानेश्वर बोबडे, शेतकरीअंतरगाव (बु.)