शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

कापूस खरेदीची घोषणा फसवी

By admin | Updated: November 15, 2014 22:43 IST

यावर्षी दुबार, तिबार पेरणी करूनही सोयाबीनला उतारी नाही व दरही नाही. त्यामुळे रोखीचे समजले जाणारे कापूस उत्पादन बऱ्यापैकी होत आहे. परंतु सध्या कापसाला अत्यल्प दर मिळत असल्याने

अच्छे दिन गेले कुठे ? : अत्यल्प दरामुळे कापूस उत्पादक संकटातप्रवीण खिरटकर - वरोरायावर्षी दुबार, तिबार पेरणी करूनही सोयाबीनला उतारी नाही व दरही नाही. त्यामुळे रोखीचे समजले जाणारे कापूस उत्पादन बऱ्यापैकी होत आहे. परंतु सध्या कापसाला अत्यल्प दर मिळत असल्याने लागवडीपासून विक्रीपर्यंतचा खर्चही निघत नाही. त्यामुळे कापूस उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे. गतवर्षीची सोयाबीनची नापिकी व यावर्षीचा कापसाचा अत्यल्प दर यामुळे शेतकऱ्यांच्या माथ्यावरचा कर्जाचा डोंगर वाढणार आहे. विशेष म्हणजे, शासनाने १५ नोव्हेंबरपासून कापूस खरेदीची घोषणा केली. परंतु आज या दृष्टीने कुठलीही तयारी दिसून आली नाही. त्यामुळे ही घोषणा हवेत विरली आहे. चालु हंगामाच्या सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना कपाशीची लागवड दोन-तीनदा करावी लागली. त्यानंतर निंदण, फवारणी, बियाणे, खत देणे, वेचाई व कापूस घरून बाजारपेठेत नेईपर्यंतचा खर्च सध्याच्या वाढत्या महागाईने शेतकऱ्यांच्या हाताबाहेर गेला आहे. सध्या कापसाला चार हजार ५० रुपये प्रति क्विंटल भाव दिला जात आहे. यामध्ये उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे यावर्षीचे कर्ज कसे फेडावे, हा प्रश्न हंगामाच्या मधातच शेतकऱ्यांना भेडसावीत आहे. कर्ज फेडले नाही तर पुढील हंगाम कसा करायचा, या विवंचनेत शेतकरी सापडले आहे. सोयाबीन पाठोपाठ कापसाच्या भावानेही शेतकऱ्यांना दगा दिल्याने कापूस उत्पादक शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात आला आहे. कापूस वेचाईचा दर आठ ते दहा रुपये किलो, त्यातही मजूर मिळत नाही. कापूस शेतात फुटून जास्त दिवस राहिल्यास तेही एक मोठी जोखीम शेतकऱ्यावर आली आहे.सहा हजार प्रति क्विंटल भाव मागणारे सत्तेत आले. भाजपाने काही दिवसांपूर्वी कापसाला सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला पाहिजे, अशी घोषणा केल्याने सध्या भाजपा सरकार राज्यात सत्तेवर आहे. त्यामुळे आज ना उद्या सध्याचे सरकार सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव देतील, या आशेने शेतकऱ्यांनी कापूस घरात भरून ठेवला. त्यानंतरही कापूस निघणे सुरू असल्याने कापूस घरात कसा ठेवावा हा प्रश्न शेतकऱ्यापुढे उभा ठाकला आहे. परंतु भाजपा सरकारमधील कापूस दरवाढीबाबत कुणीही बोलायला तयार नाही. त्यामुळे सध्या असलेल्या दरात शेतकरी कापूस तोट्यात विकत असल्याचे दिसून येत आहे. विरोधकही कापूस दर वाढीबाबत बोलत नाही. दिवाळी अधिवेशनात कापूस दरवाढीची घोषणाही झाली व त्याची अंमलबजावणी होईपर्यंत शेतकऱ्याजवळील कापूस संपलेला असेल. त्यामुळे कापूस उत्पादकाची विवंचना वाढली आहे. शासनाने कापसाला सध्या सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव देऊन शेतकऱ्यांना अच्छे दिन दाखवावे, अशी रास्त अपेक्षा कापूस उत्पादक शेतकरी व्यक्त करीत आहेत.