शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कापूस व सोयाबीनची उतारी घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 22:37 IST

सध्याच्या हंगामात अत्यल्प प्रमाणात पाऊस पडला. त्यात कापूस व सोयाबीन पीक तग धरून आहे. शेंगा व पात्या लागणे सुरू झाले.

ठळक मुद्देवरूणराजा कोपला : शेतकºयांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर

प्रवीण खिरटकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : सध्याच्या हंगामात अत्यल्प प्रमाणात पाऊस पडला. त्यात कापूस व सोयाबीन पीक तग धरून आहे. शेंगा व पात्या लागणे सुरू झाले. परंतु पाऊस नाही व उष्णता वाढत असल्याने जमिनीत भेगा पडून सोयाबीनच्या शेंगात दाणे भरणार नाही व कापसाच्या पात्या गळून पडू लागल्याने यावर्षी कापूस व सोयाबीन पिकाची उतारी घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भात पीक हातून गेल्याने शेतकरी संकटात सापडला असल्याचे दिसून येत आहे.हंगामात रोखीचे पीक म्हणून कापूस व सोयाबीन, तुर या पिकाकडे शेतकरी बघत असतात. सोयाबीन पीक कमी खर्चात होऊन लवकर उत्पादन हातात येत असल्याने शेतकरी या पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळले आहे. यावर्षीसुद्धा सोयाबीन, कपाशी, तूर या पिकाची लागवड करण्यात आली आहे. हंगामाच्या सुरूवातीला पाऊस पडल्याने पिकाची पेरणी करण्यात आली. अधेमधे पाऊस पडत असल्याने व पिकांची मशागत शेतकºयांनी चांगल्याप्रकारे केल्याने पिकाची स्थिती चांगली आहे. आता कपाशीला पात्या लागणे, सोयाबीनला शेंगा लागत आहे. अशातच पावसाने दडी मारली आहे. उष्णतेमध्ये भर पडत असल्याने जमिनीला भेगा पडत आहे. त्यामुळे कपाशीच्या पात्या गळून पडत आहे तर सोयाबीनच्या शेंगामध्ये दाणे भरत नाही.येत्या काही दिवसात पाऊस पडला नाही तर कपाशी व सोयाबीन पिकाच्या उतारीत घट होवून त्यावर लागलेला खर्चही निघणे कठीण होणार आहे. त्यामुळे शेतकºयांच्या मनात धडकी भरली आहे.धानाला सर्वाधिक फटकाधान पीक घेण्याकरिता पºहे टाकावे लागते. शेतकºयांनी पºहे टाकले. पाऊस अचानक बेपत्ता झाला. जवळच्या पाण्याने पºहे वाचविण्याची धावपळ सुरू झाली. परंतु बांध्यामध्ये रोवणी करता आली नाही. त्यामुळे शेतकºयांनी आता भात पिकाऐवजी चना व गहु पिकासाठी आपली जमीन सज्ज करून ठेवल्याचे दिसून येत आहे.जनावरांना घरीच पाजावे लागते पाणीपावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्याने शेताच्या परिसरात असलेले नाले, बोड्या याध्ये पाणीसाठा नाही. त्यामुळे शेतकºयांना आपली पाळीव जनावरे आजही पावसाळ्यात घरी आणून पाणी पाजावे लागत आहे.शेतकºयांमध्ये पाण्यासाठी भांडणेसध्याचा हंगाम पावसाळ्याच्या हंगाम म्हणून ओळखला जातो. काही धरणातील पाणी सध्या कॅनलने सोडले जात आहे. आता पिकांना पाण्याची आवश्यकता असल्याने ओलिताच्या पाण्यावरून शेतकºयांमध्ये भांडणे होवून पोलिसात तक्रारीही दाखल झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.कापूस व सोयाबीन वाढीच्या अवस्थेत आहे. पावसाची आवश्यकता आहे. भात पिकाची रोवणी पावसाअभावी रखडलेली आहे.- व्ही. आर. प्रकाश, तालुका कृषी अधिकारी, वरोरापाऊस नसल्याने उष्णतेमध्ये वाढ झाली. त्यामुळे शेंगामध्ये दाणे भरणे प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. पात्या गळत आहे. जमिनीला भेगा पडणे सुरू आहे. पावसाअभावी गंभीर समस्या निर्माण झाली आहे.- मधुकर भलमे, प्रगतशील शेतकरी, चारगाव (खु)