शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

आदिवासींच्या जमीन सपाटीकरण योजनेत २४ लाखांचा भ्रष्टाचार

By admin | Updated: February 2, 2015 23:04 IST

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत वनहक्क कायद्याअंतर्गत येणाऱ्या व शेत जमिनीचे पट्टे दिलेल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतात जमीन सपाटीकरण करणे, वनऔषधी

गडचांदूर : महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत वनहक्क कायद्याअंतर्गत येणाऱ्या व शेत जमिनीचे पट्टे दिलेल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतात जमीन सपाटीकरण करणे, वनऔषधी व फळबाग लागवड कार्यक्रमासाठी कोरपना तालुक्यातील सन २०११-१२, २०१२-१३ या वर्षात विशेष केंद्र सहाय्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. मात्र शेतात कोणतेही काम न करताच २४ लाखांचा निधी आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांनी हडप केला. लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करून आदिवासींना विकासापासून वंचित ठेवणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी कोरपना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सय्यद आबीद अली यांनी आदिवासी विकास मंत्री अमरीश आत्राम यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.कोरपना तालुक्यातील जांभुळधरा, निजामगोदी, उमरहिरा, मांडवा येथील २४ आदिवासी शेतकऱ्यांची या योजनेअंतर्गत निवड झाली. ज्या शेतकऱ्यांच्या संमतीपत्रावर स्वाक्षऱ्या घेतल्या. मात्र प्रत्यक्षात त्या शेतकऱ्यांच्या शेतात जमीन सपाटीकरण केले नाही अथवा वृक्ष लागवड केली नाही. आदिवासी शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या या योजनेत शेतजमिनीचे सपाटीकरण करणे, फळझाडांसाठी खड्डे खोदणे, फळझाड लावणे, गांडूळ खत निर्माण करणे आदींचा समावेश आहे. मात्र ही कामे ज्या यंत्रणेला दिली होती, त्यांनी आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या संगनमताने कामे न करताच लाखो रुपयाचा शासनाचा निधी हडप केला. आदिवासीची फसवणूक केली. या संपुर्ण प्रकरणाची कसून चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे नेते आबीद अली यांनी आदिवासी विकास मंत्र्याकडे केली आहे. कारवाई न झाल्यास तिव्र आंदोलन करण्याचा इशारा आबीद अली यांनी दिला आहे. (वार्ताहर)