तलावांची दुरुस्ती करावी
घुग्घुस: शेजारी असलेल्या अनेक गावांमध्ये तलाव आहे. मात्र ते दुर्लक्षित असल्यामुळे शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना या तलावांचा पाहिजे तसा उपयोग होत नाही. त्यामुळे या तलावांची दुरुस्ती करून तलावाचे पाणी सिचंनासाठी द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांमध्ये निराशा
ब्रह्मपुरी : तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी आर्थिक संकटांचा सामना करण्याची वेळ आली आहे. परतीचा पाऊत तसेच विविध किडरोगांनी धानाच्या उत्पादनात कमालीची घट झाली. लागवडीचा खर्चही निघाला नाही. अस्मानी व सुलतानी संकटात अडकलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे.