शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

आठवड्याअखेर सुरु होणार मनपाचे कोविड रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 05:00 IST

शहरात एकूण २६ केंद्र प्रस्तावित असून, सध्या १७ केंद्रांसाठी मनुष्यबळ उपलब्ध आहे. केंद्र वाढविण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, लसीची दुसरी मात्रा घेणाऱ्यांसाठी काही केंद्र राखीव ठेवणे, आदी विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली. आठवडाभरात ४५ खाटांचे कोविड रुग्णालय रुग्णसेवेसाठी सज्ज केले आहे. त्यासाठी ४५  खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. यात वातानुकूलित सुविधा राहील.  ६ डॉक्टर, ६ परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली.

ठळक मुद्देसुविधांची पूर्तता : ४५ खाटांची व्यवस्था, ६ डॉक्टर, ६ परिचारिका नियुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहर महानगरपालिकेच्या नवीन बेघर निवारा येथे स्वतंत्र ४५ खाटांचे कोविड रुग्णालय सुरू करण्यासाठी सर्वसोयीसुविधांची पूर्तता झाली आहे. त्यासाठी ४५  खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. ६ डॉक्टर, ६ परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या शनिवारपर्यंत उर्वरित वैद्यकीय सुविधांची पूर्तता होताच येत्या आठवड्याअखेर मनपाचे कोविड हॉस्पिटल सुरू होण्याची शक्यता आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा आढावा घेण्यासाठी बुधवारी सिटी टास्क फोर्सची बैठक पार पडली. यावेळी महापौर राखी संजय कंचर्लावार, आयुक्त राजेश मोहिते, उपमहापौर राहुल पावडे, सत्तापक्षनेता संदीप आवारी, गटनेते पप्पू देशमुख, सहआयुक्त धनंजय सरनाईक, सहआयुक्त शीतल वाकडे, सहआयुक्त विद्या पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आविष्कार खंडारे, शहर अभियंता महेश बारई, मुख्य लेखा अधिकारी संतोष कंदेवार, मुख्य लेखा परीक्षक मनोज गोस्वामी, आदींसह वैद्यकीय चमू उपस्थित होते.शहरात एकूण २६ केंद्र प्रस्तावित असून, सध्या १७ केंद्रांसाठी मनुष्यबळ उपलब्ध आहे. केंद्र वाढविण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, लसीची दुसरी मात्रा घेणाऱ्यांसाठी काही केंद्र राखीव ठेवणे, आदी विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली.आठवडाभरात ४५ खाटांचे कोविड रुग्णालय रुग्णसेवेसाठी सज्ज केले आहे. त्यासाठी ४५  खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. यात वातानुकूलित सुविधा राहील.  ६ डॉक्टर, ६ परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे. लवकरच एमबीबीएस आणि फिजिशियन डॉक्टरची नियुक्ती करण्यात येईल. येत्या काही दिवसांत औषध साठा आणि वैद्यकीय साहित्यांचा पुरवठा होईल, अशी माहिती  वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आविष्कार खंडारे यांनी बैठकीत दिली.

 

गृहविलगीकरणातील रुग्ण संख्या ४० टक्क्यावर आणणारगृहविलगीकरणातील रुग्ण संख्या कमी करून त्यांना शासकीय कोविड केअर सेंटरमध्ये उपचार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. सध्या महानगर पालिका हद्दीत ८० टक्के रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. अनेकांच्या घरी रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था नाही. झोपडपट्टी परिसरात बिकट स्थिती आहे. अशावेळी संसर्ग पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे गृहविलीगीकरणातील रुग्ण संख्या ४० टक्क्यावर आणण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला देण्यात आल्या.

एप्रिल महिन्यात कोरोना रुग्णांचा उच्चांक गाठला होता. राज्य शासनाने निर्बंध घातल्यानंतर नागरिकांनी दिलेल्या सहकार्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा काहीसा घटला आहे. शहरातील बंगाली कॅम्प, गंज वॉर्ड अशा ठिकाणी गर्दी होणार नाही, त्यासाठी झोनच्या सहआयुक्तांनी पुढील १५ दिवस अतिदक्षता घ्यावी.- राजेश मोहिते, आयुक्त, मनपा, चंद्रपूर

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या